3 Year Old Girl Died After Shortage Of Money For Operation in Prayagraj Hospital
कुटुंबाला उपचारखर्च नाही परवडला; रुग्णालयानं पोट न शिवताच चिमुकलीला बाहेर काढलं; उपचाराअभावी मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 5:29 PM1 / 10आपण डॉक्टरांना देव मानतो. कारण अनेकदा तेच माणसाच्या मृत्यूच्या दाढेतून परत आणतात. त्यामुळे डॉक्टरांना देवदूत म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.2 / 10अनेकदा मरणासन्न व्यक्तीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत आणणारे डॉक्टरच कधी कधी एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारात ढकलून देतात. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये अशीच घटना घडली आहे. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासला गेला आहे.3 / 10उपचाराचा पूर्ण खर्च देऊ न शकल्यानं खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी एका चिमुरडीची शस्त्रक्रिया अर्धवट सोडली. उपचारांसाठी आवश्यक असलेली रक्कम गोळा करण्यात अपयश आल्यानं डॉक्टरांनी ३ वर्षांच्या चिमुकलीला ऑपरेशन टेबलवरून त्याच अवस्थेत तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. 4 / 10धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी चिमुकलीचं पोटदेखील शिवलं नाही. उपचार न मिळाल्यानं मुलीची प्रकृती बिघडत गेली आणि तिनं प्राण सोडला.5 / 10प्रयागराजमधल्या करेली भागात राहणाऱ्या ब्रह्मदीन मिश्रा यांच्या तीन वर्षीय मुलीला पोटाची समस्या होती. तिला उपचारांसाठी प्रयागराजमध्ये धूमनगंजमधील रावतपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.6 / 10काही दिवसांनंतर मुलीच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया केली गेली. रुग्णालय प्रशासनानं यासाठी दीड लाख रुपये घेतले.7 / 10दीड लाख घेतल्यानंतर प्रशासनानं आणखी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. पाच लाख रुपये देण्यात अपयशी ठरल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं मुलीसह तिच्या कुटुंबाला बाहेर काढलं.8 / 10पाच लाख रुपये जमा करण्यात अपयशी ठरल्यानं रुग्णालयाला आम्हाला बाहेर काढलं. त्यांनी शस्त्रक्रियेनंतर माझ्या मुलीचं पोटदेखील शिवलं नव्हतं. त्याच अवस्थेत त्यांनी तिला आमच्याकडे सोपवलं, अशी व्यथा मुलीच्या वडिलांनी मांडली.9 / 10मुलीचे वडील तिला घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये गेले. मात्र एकाही रुग्णालयानं उपचार करण्याची तयारी दाखवली नाही. तुमच्या मुलीची स्थिती गंभीर आहे. ती वाचू शकणार नाही, अशी उत्तरं त्यांना सगळ्यांनी दिली.10 / 10एकाही रुग्णालयानं दाखल करून न घेतल्यानं अखेर मुलीनं प्राण सोडला. वेळेत उपचार न मिळाल्यानं मुलगी दगावली. तीन वर्षांची लेक गमावल्यानं वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियानं रुग्णालयाला धारेवर धरलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications