शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत आले होते नरेंद्र मोदी, केली होती खास प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 4:39 PM

1 / 5
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ३२ वर्षांपूर्वीचे आजचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येमध्ये पूजाआर्चा करताना दिसत आहेत.
2 / 5
३२ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी १९९२ रोजी मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येतील राम मंदिरामध्ये आले होते. त्यावेळी ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकतेचा संदेश पसरवण्यासाठी ते एकता यात्रेवर होते.
3 / 5
हे फोटो शेअर करताना असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा देत राम मंदिर बनल्यावर परत येईन, अशी प्रतिज्ञा केली होती. आता हे फोटो शेअर करताना अखेरीस नरेंद्र मोदी यांची तपश्चर्या फळाला आली आहे.
4 / 5
ट्विटरवर हे फोटो शेअर करताना लिहिण्यात आलंय की, असंख्य हिंदूच्या शतकांनुशतकांच्या दृढनिश्चयानंतर श्रीरामाला त्याच्या जन्मभूमीमध्ये एका भव्य मंदिरात पुनर्स्थापित करण्यात येणार आहे.
5 / 5
अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालं आहे. तसेच गर्भगृहामध्ये रामललांना विराजमान करण्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्यामधून रामललांच्या मूर्तीची राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा