५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 7:23 AM
1 / 9 कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशातील रेल्वेसेवा मार्च महिन्याच्या अखेरीपासून बंद आहे. मोजक्या रेल्वे गाड्या सोडल्या तर उर्वरित ट्रेन अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत. ही स्थिती कधीपर्यंत सुधारेल याबाबत अद्याप काहीही निश्चितपणे सांगण्याची परिस्थिती नाही. 2 / 9 अशातच कोरोनाची साथ संपल्यानंतर जेव्हा रेल्वेसेवा नव्याने सुरू होईल तेव्हा काय व्यवस्था असावी याबाबत सध्या भारतीय रेल्वेकडून विचारमंथन सुरू आहे. दरम्यान, सध्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर भारतीय रेल्वेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. 3 / 9 दरम्यान, सध्या रेल्वेच्या राष्ट्रीय वेळापत्रकात समाविष्ट असलेल्या ५०० ट्रेन बंद करण्याचा तसेच १० हजार स्टॉप बंद करण्याबाबत भारतीय रेल्वेकडून गांभीर्याने विचार सुरू आहे. 4 / 9 रेल्वेकडून सध्या झिरो बेस्ड टाइम टेबलवर काम सुरू आहे. आणि त्यामुळे रेल्वेच्या कमाईत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ १५०० कोटींची भर पडेल, असा रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. 5 / 9 रेल्वेमार्गांवरून मालगाड्यांची वाहतूक वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. विचाराधिन असलेल्या योजनेनुसार नव्या वेळापत्रकामध्ये हायस्पीड कॉरिडॉरमध्ये १५ टक्के अधिक मालगाड्या चालवण्यासाठी वेळ काढली जाईल. तसेच देशातील संपूर्ण रेल्वे नेटवर्कमद्ये प्रवासी गाड्यांच्या सरासरी वेगामध्ये सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. 6 / 9 रेल्वेच्या या झिरो बेस्ड टाइम टेबलवर रेल्वे आणि आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ सध्या काम करत आहेत. यावर लॉकडाऊनदरम्यान कामास सुरुवात झाली होती. सध्याच्या घडीला हे आधुनिक ऑपरेटिंग टूल विकसित करणे ही रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तसेच त्यावर वरिष्ठ स्तरावरून देखरेख ठेवण्यात येत आहे. 7 / 9 ज्या ट्रेन वर्षभरातील सरासरी अर्धा काळ रिकाम्या धावतात, अशा ट्रेन रद्द केल्या जातील. गरजेनुसार अशा ट्रेन गर्दी असलेल्या अन्य गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये विलीन केल्या जातील. 8 / 9 लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या वाटेत मोठे शहर नसल्यास दोन स्टेशनांदरम्यान २०० किमी अंतरादरम्यान थांबणार नाहीत. तसेच रेल्वेच्या एकूण १० हजार स्टॉपची यादी तयार करण्यात आली आहे, हे स्टॉप बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. 9 / 9 मात्र काही मोजक्याच ट्रेनचे स्टॉप बंद करण्यात येतील, उर्वरित रेल्वेगाड्या ह्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे चालत राहतील, असे रेल्वेच्या अधिरकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आणखी वाचा