शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 5:44 PM

1 / 7
आंध प्रदेशमधील बेलम केव्ह्ज ही अॅडव्हेंचर किंवा काही थरार करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनासाठी मस्त ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.
2 / 7
मणिपूरचा लोकतक सरोवरही पर्यटकांचे आकर्षण आहे. या सरोवर परिसरातील नैसर्गिक चमत्कार पाहवतच बसावा, असेच वाटते. येथे छोटे छोटे द्वीप पाण्यात तरंगताना दिसतात.
3 / 7
कर्नाटकचा कॉलमॅनर वसाल्टिक लावा म्हणजे मोठ-मोठ्या दगडांचा परिसर. विशेष म्हणजे ज्वालामुखीमुळे येथील मोठ-मोठ्या पर्वतांची निर्मित्ती झाली आहे. या ठिकाणाला कोकोनट आयलँड असेही म्हणतात.
4 / 7
महाबळेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण असून पर्यटकांची येथे मोठे प्रमाणात गर्दी होते. सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाणी पर्यटकांसाठी नैसर्गिक मेजवाणीच.
5 / 7
जबलपूरच्या मार्बल रॉक्स येथील एक जबरदस्त पर्यटन ठिकाण आहे. 3 किमींवर पसरलेल्या या पर्वताच्या मधून नर्मदा नदी वाहते. या पर्वतावर सूर्यकिरणे पडताच, नदीच्या पाण्याचा अन् पर्वताचाही रंग बदलतो.
6 / 7
आंध्र प्रदेशमधील बोर्रा केव्हसही पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे. देश विदेशातून आंध्र प्रदेशमध्ये या गुहा पाहण्यासाठी लोकं येतात. ही गुहा 260 फूट लांब आहे.
7 / 7
मेघालयच्या चेरापूंजी येथेही तुम्हाला निसर्गाचा अदभूद चमत्कार पाहायला मिळेल. येथील 3000 फूट लांबीचे रबराची झाडे येथील विशेष आकर्षण आहे. येथील नदीवर या झाडांचा एक पूलच तयार झाला आहे.
टॅग्स :tourismपर्यटनNatureनिसर्गGondoda Cavesगोंदोडा गुंफा