72 Year Old Lalithamma Stood First In The 200 Metre Walk In Bengaluru
सीनिअर सिटीझन्सचा 'युवा' जोश; 72 वर्षीय ललितम्माने जिंकली 200 मीटर वॉकिंग स्पर्धा By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 11:44 AM1 / 5कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये ज्येष्ठ महिलांसाठी वॉकिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एका महिलेने काही मिनिटात 200 मीटर वॉकिंग पूर्ण केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. 2 / 51 ऑक्टोबरला होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 72 वर्षीय ललितम्मा यांनी सांगितले की, मी स्वत: दररोज न चुकता वॉकिंग करते त्यामुळे आरोग्य आणि शरीर चांगले फिट राहते. या वॉकिंग स्पर्धेत ललितम्मा या सर्वांत पुढे होत्या. 3 / 5ललितम्मा यांनी सांगितले की, मी एका कॉलेजमध्ये प्राचार्य होते. मी जेव्हा युवा होते त्यावेळी धावण्याच्या स्पर्धेत मला अनेकदा मेडल्स आणि पुरस्कार मिळाले आहेत. मी दिवसातून कमीत कमी 1 तास चालते. त्याचाच फायदा मला या स्पर्धेत विजयी करण्यासाठी झाला. 4 / 5ललितम्मा यांच्याप्रमाणे 81 वर्षीय सरोजम्मा यांनी 100 मीटर वॉकिंगमध्ये विजय मिळविला आहे. 5 / 5कर्नाटक सरकारकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications