99 of omicron patients are recovering within week even doctors are cautioning know why
Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 3:24 PM1 / 14देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,379 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 124 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 14 कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,82,017 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. 3 / 14ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या 1,892 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 4 / 14वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. मात्र असं असताना आता ओमायक्रॉनबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 5 / 14आठवड्याभरात ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण हे बरे होत आहेत. डॉक्टरांनी याबाबच माहिती दिली असून रिसर्चमध्ये खुलासा करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 6 / 14डॉ. सुरेश कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेले जवळपास 99 टक्के रुग्ण हे आठवड्य़ाभरात ठीक झाले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरतो पण डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. 7 / 14डेल्टा प्रकारामुळे उद्भवलेल्या कोरोनातून बरं होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर काही रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागला. काही डेल्टा रुग्ण दोन महिन्यांनंतर निगेटिव्ह होत होते. 8 / 14आकडेवारीनुसार, Omicron प्रकाराच्या बाबतीत, 92% रुग्णांची RT-PCR चाचणी एका आठवड्यात निगेटिव्ह येत आहे. त्याच वेळी, 5% रुग्ण आठव्या दिवशी तर 3% रुग्ण नवव्या दिवशी निगेटिव्ह आढळले आहेत. 9 / 14डॉ सुरेश कुमार यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा टीबी यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ओमायक्रॉन संसर्गातून बरे होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागत असल्याचं निदर्शनास आल्याचं म्हटलं आहे.10 / 14बहुतेक ओमायक्रॉन रुग्णांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि काहींना सौम्य ताप, अशक्तपणा, मळमळ आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे असतात. या नवीन प्रकाराची लागण झालेल्या मुलांमध्ये पोटदुखीच्या तक्रारीही दिसून येत आहेत. 11 / 14डॉक्टरांचे म्हणणे आहे की श्वास घेण्यात अडचण जवळजवळ नाहीशी झाली आहे, जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त दिसून आली. मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून योग्य काळजी घेतली जात आहे. 12 / 14एका वरिष्ठ डॉक्टरांनी लोकनायक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 105 ओमायक्रॉन रुग्णांपैकी कोणालाही ऑक्सिजनच्या आधाराची गरज नव्हती. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असते अशा रुग्णांमध्ये डेल्टा संसर्ग आढळून आला आहे असं म्हटलं. 13 / 14डॉ. मेहरा यांनी ओमायक्रॉन हा बराच काळ घशात राहतो, त्यामुळे तो वेगाने पसरतो, परंतु फुफ्फुसात तो तितक्या वेगाने स्वतःची कॉपी करू शकत नाही. त्यामुळे रुग्णाला गंभीर आजार होत नसल्याचं सांगितलं. 14 / 14ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असल्य़ाने तो मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करत आहे. अशा वेळी काळजी घेणं आणि सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications