शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज ४ हजार भक्तांची गर्दी, १०० रुपयांची पावती, १४ एकरांत आश्रम.., करौली बाबांचं असं वाढलं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 9:02 AM

1 / 9
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील करौली बाबा सध्या चर्चेत आहेत. करौली बाबा संतोष सिंह भदोरिया यांच्यावर एका भक्ताने मारहाणीचा आरोप केलाय. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
2 / 9
बाबा आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होत असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर आश्रमात भाविकांना १०० रुपयांची पावतीदेखील फाडावी लागते.
3 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सिंह भदोरिया उर्फ ​​करौली बाबा जेव्हा कोळसा महामंडळाचे अध्यक्ष बनले त्यावेळी ते प्रसिद्धीझोतात आले. मात्र, ही प्रसिद्धी काही दिवसांसाठीच टिकलं. करौली बाबांवर अनेक गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत. १९९२-९५ दरम्यान त्यांच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत.
4 / 9
बाबांनी करौली आश्रम बांधला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शनि मंदिर बांधलं. यानंतर त्यांनी आणखी काही जमीन खरेदी करून करौली आश्रम सुरू केला. या आश्रमात आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यात आलं. यानंतर कामाख्या मातेचे मंदिर बांधण्यात आलं, त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या तंत्र-मंत्राचा प्रचार सुरू केला. करौली बाबा काही वेळातच खूप प्रसिद्ध झाले.
5 / 9
करौली बाबा बनल्यानंतर धनवर्षाव सुरू झाला. यानंतर त्यांनी तीन वर्षांत कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. त्यांचा आश्रम १४ एकरांवर पसरलेला आहे. दररोज ३ ते ४ हजार लोक आश्रमात पोहोचतात. येथे येणाऱ्या भाविकांना प्रथम १०० रुपयांची पावती फाडावी लागते. त्यानंतर तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक खर्च येतो.
6 / 9
या आश्रमात सातत्यानं होम होतो. करौली बाबा संतोष भदोरिया स्वतः होम करण्याचा मंत्र देतात. या हवनाचा खर्च ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे. काही विशेष करायचं असेल तर खर्चाला मर्यादा नाही.
7 / 9
आश्रमात पूजेच्या साहित्याचीही दुकानं आहेत. होम करण्यासाठी लागणारं साहित्य आश्रमातूनच घ्यावं लागते. बागेश्वर धाम प्रमाणे इथेही लोक त्यांच्या इच्छेनुसार अर्ज करतात. फरक एवढाच आहे की बागेश्वर धाममध्ये अर्ज करण्यासाठी पैसे लागत नाहीत, परंतु येथे १०० रुपयांची पावती फाडली जाते.
8 / 9
संतोष सिंह भदौरिया मूळचे उन्नावच्या बारह सगवर येथील आहेत. उत्तर प्रदेशासह देशात महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन गाजत होते.
9 / 9
त्यावेळी किसान यूनियन नेते संतराम सिंह यांची हत्या झाली. तेव्हा संतोष सिंह भदौरिया यांना टिकैत यांनी सरसोल परिसराची जबाबदारी दिली. शेतकरी आंदोलनात पोलिसांसोबत ते भिडले होते.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश