A girl from an orphanage in Jaisalmer, Rajasthan was adopted by a couple from Gujarat
जोडप्याचा कौतुकास्पद निर्णय! झुडपात फेकलेल्या चिमुकलीला घेतलं दत्तक, ढोल वाजवत केलं स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 5:56 PM1 / 7राजस्थानातील जैसलमेर येथील अनाथ आश्रमात एक अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. येथील एका चिमुकलीला गुजरातमधील जोडप्याने दत्तक घेतले आहे. हे गुजराती कुटुंब आपल्या मुलीला न्यायला अनाथ आश्रमात आले, तेव्हा नयनरम्य दृश्य होते.2 / 7कुटुंबात नवीन सदस्याचा समावेश झाल्याची उत्सुकता कुटुंबीयांमध्ये होती. ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहाचे वातावरण होते. 3 / 7जैसलमेर चाइल्ड वेल्फेअर कमिटीचे अध्यक्ष अमीन खान यांनी सांगितले की, ज्या चिमुकल्यांचा जन्म होताच त्यांचे जवळचे त्यांच्यापासून दूर गेलेले असतात त्यांना इथे ठेवले जाते. यातीलच एक मुलगी जिला काटेरी झुडपात फेकण्यात आले होते. 4 / 7ही मुलगी २ फेब्रुवारीला जैसलमेर गावात काटेरी झुडपात सापडली होती. यानंतर बाल कल्याण समितीने या मुलीला शासकीय बालसुधारगृहात पाठवले. या मुलीचे येथे पालनपोषण केले जात होते. 5 / 7त्यानंतर मे महिन्यापासून या मुलीला दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. तिला गुजरातमधील एका जोडप्याने दत्तक घेतले आहे. या जोडप्याच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत पण त्यांना मूलबाळ नाही. म्हणून त्यांनी या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.6 / 7युपीएससी टॉपर आणि जैसलमेरच्या कलेक्टर 'टीना दाबी' यांच्या नावाने मुलीचे नाव ठेवले गेले होते. पण गुजराती दाम्पत्याने तिचे नाव 'कथा पटेल' असे ठेवले आहे.7 / 7गुजराती जोडप्याने या चिमुरडीला दत्तक घेत तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. नंतर जैसलमेर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अमीन खान यांनी गुजराती दाम्पत्याला मुलगी दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. आणखी वाचा Subscribe to Notifications