मध्य प्रदेशातील करोडपती शिपाई, पैसा मिळताच सोन्याच्या विटा खरेदी करायचा; अशी जमवली करोडोंची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:28 IST
1 / 9मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या घरातून आणि कार्यालयातून सापडलेल्या दागिने आणि चांदीच्या विटांमागील धक्कादायक माहिती लोकायुक्तांना मिळाली आहे. रोख रक्कम आली की सौरभ शर्मा सोन्या-चांदीच्या विचा बनवून घेत होता. 2 / 9सोने आणि चांदी नंतर विकत घेतलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकले जातात. चांदी किंवा सोने जर विट स्वरूपात असेल तर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि यामुळेच सौरभ याच्या घरातून दागिन्यांपेक्षा जास्त चांदी सापडली आहे आणि तेही विटांच्या रूपात ज्यावर कोणतेही श्रम शुल्क आकारले जात नाही, भरावे लागेल.3 / 9मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ शर्मा यांच्या घरातून आणि कार्यालयातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये करोडोंचे व्यवहार आहेत. सौरभ शर्मा यांच्याकडे रोख रक्कम भरपूर होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा ठेवल्याने कदाचित त्या खराब होण्याची भीती सौरभ शर्मा यांना वाटत होती. नोटा जास्त काळ जवळ ठेवल्या तर त्या खराब होऊ शकतात याची भिती त्याला होती. म्हणून तो शक्य तितक्या लवकर उरलेल्या पैशातून चांदी किंवा सोन्याच्या विटा विकत घेत होता.4 / 9सौरभ यांच्या घरात झाडाझडतीमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या आणि चांदीच्या विटा सापडल्या आहेत.5 / 9मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या एका माजी शिपाईच्या ताब्यात ७.९८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सापडली असून त्यात २.८७ कोटी रुपये रोख आणि २३४ किलो चांदीचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक लोकायुक्त पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लोकायुक्तांच्या विशेष पोलीस आस्थापनेने सौरभ शर्मा यांच्या मालकीच्या अनेक आवारातून या मालमत्ता जप्त केल्या आहेत.6 / 9लोकायुक्त पोलिसांनी १८ आणि १९ डिसेंबर रोजी शर्मा यांचे निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली होती. लोकायुक्त पोलीस महासंचालक जयदीप प्रसाद यांनी सांगितले की, सौरभ शर्माचे वडील आरके शर्मा हे सरकारी डॉक्टर होते आणि २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले.7 / 9आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, यानंतर सौरभ शर्मा यांची २०१५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर राज्य परिवहन विभागात कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झाली आणि त्यांनी २०२३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली.8 / 9जयदीप प्रसाद म्हणाले की, सौरभ शर्माने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर त्याची आई, पत्नी, नातेवाईक आणि जवळचे सहकारी चेतन सिंग गौर आणि शरद जैस्वाल यांच्या नावे शाळा आणि हॉटेल्स उभारण्यासह मोठी संपत्ती जमा करण्यासाठी केला.9 / 9सौरभ शर्माचे सहकारी गौर यांच्याकडूनही आयकर विभागाने रोख रक्कम आणि सोने जप्त केले आहे. प्रसाद म्हणाले की, झडतीदरम्यान सापडलेले बँक तपशील आणि जमिनीची कागदपत्रे तपासली जात आहेत.