A Raghav bull at Goshala in Amreli, Gujarat costs more than Fortuner at over Rs 45 lakh
PHOTOS : फॉर्च्युनरपेक्षाही जास्त 'भाव' अन् राजेशाही 'थाट', 'राघव' बैलाची बातच न्यारी By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 9:19 PM1 / 8गुजरातमधील अमरेली येथे एक मोठी गोशाळा आहे, जिथे गायी, म्हशी, बैल यांची काळजी घेतली जाते. येथील काही बैलांची किंमत लाखोच्या घरात आहे. 2 / 8या गोठ्यातील राघव या बैलाची किंमत 'फॉर्च्युनर' कारपेक्षा जास्त आहे. 3 / 8अमरेली जिल्ह्यातील शेतकरी शेतीसोबतच पशुपालन देखील करतात, त्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. गीर जातीच्या गायी आणि बैलांची इथे काळजी घेतली जाते. येथील गाई, म्हशी आणि बैलांची किंमत लाखोंमध्ये होते. 4 / 8सावरकुंडला तालुक्यातील अमृतवेल गावात खोडियार मंदिरात ही गोशाळा आहे. इथे 'राघव' नावाचा बैल आहे, ज्याची किंमत ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचा राजेशाही थाट सर्वांचे लक्ष वेधतो.5 / 8या गोशाळेत 'लाडली' नावाचे एक वासरू देखील आहे. लक्षणीय बाब म्हणजे ते चार वर्षांचे असताना त्याला ११ लाखाची बोली लागली होती.6 / 8या गोशाळेत गिर गाय आणि चांगल्या जातीची वासरे तयार केली जातात. 7 / 8लाडली या वासराच्या आईला ८.६० लाख रूपयांमध्ये जवळच्या शेतकऱ्याने खरेदी केले. तर, राघव या बैलाची किंमत ४५ लाख रूपये एवढी आहे. 8 / 8सर्वांच्या लाडक्या वासराचे वय ११ महिने आहे. गोशाळेतून वासरे किंवा इतर जनावरांची विक्री केली जात नाही. मात्र, येथे चांगल्या जातीच्या गायी निर्माण होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications