शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 1:55 PM

1 / 8
जर तुमचं आधार कार्ड हरवल असेल किंवा तुम्हाला त्याचा चुकीचा वापर होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत फायद्याची गोष्ट आहे. तुम्ही घरबसल्या आधार कार्ड ऑनलाईन लॉक करू शकता. कसं ते जाणून घेऊया...
2 / 8
कोणत्याही देशात राहण्यासाठी त्या देशाच्या नागरिकाकडे काही कागदपत्रं असणं आवश्यक असतं. ज्या कागदपत्रांची दररोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी गरज असते.
3 / 8
भारतातील सर्व कागदपत्रांमध्ये ज्या गोष्टीचा सर्वाधिक वापर केला जातो ते म्हणजे आधार कार्ड. ९० कोटींहून अधिक लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे.
4 / 8
अनेकांना आधार कार्डमधील एका फीचरची माहिती नसते. हे फीचर आधार कार्ड लॉक करण्यासाठी आहे. ज्यामुळे चुकीचा वापर रोखता येतो.
5 / 8
आधार कार्ड लॉक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि 'My Aadhaar' या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
6 / 8
Aadhaar Services निवडावं लागेल आणि नंतर Aadhaar Lock/Unlock वर क्लिक करावं लागेल. यानंतर, तुम्हाला 'UID लॉक' निवडावं लागेल आणि तुमचा UID क्रमांक तुमचं पूर्ण नाव आणि पिन कोडसह टाकावा लागेल.
7 / 8
त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचं आधार कार्ड लॉक होईल.
8 / 8
अनेक वेळा लोकांचं आधार कार्ड गडबडीत कुठेतरी हरवलं जाते. अशा परिस्थितीत तुम्ही आधार कार्ड लॉक करून तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड