शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सहज आणि सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा ई-आधार कार्ड; 'या' आहेत स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 1:10 PM

1 / 11
आधार कार्ड हे अत्यंत गरजेचं असून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. कोणतीही व्यक्ती जेव्हा नवीन आधार कार्ड काढते त्यावेळी एक एनरोलमेंट नंबर मिळतो. त्या नंबरच्या मदतीने आपण आपलं आधार कार्ड हे ऑनलाईन देखील डाऊनलोड करू शकतं.
2 / 11
ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर, त्यानंबरवर पाठवण्यात आलेला वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी, नाव, पत्ता आणि आपली जन्मतारीख याचे तपशील द्या. त्यानंतर आधार कार्ड आपल्या पत्त्यावर पाठवले जाते.
3 / 11
सर्वप्रथम आधारच्या UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
4 / 11
आधार कार्ड डाऊनलोडसाठी My Aadhaar मध्ये जाऊन Download Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
5 / 11
https://eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर जाऊन ही तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. या लिंकवरून डायरेक्ट ई-आधारकार्ड डाऊनलोड करता येईल.
6 / 11
Aadhaar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल.
7 / 11
तुमच्याकडे आधार कार्ड नंबर, एनरोलमेंट नंबर (नोंदणी क्रमांक), व्हर्च्युअल आयडी यापैकी जे असेल तो पर्याय निवडा. यात आवश्यक असणारी माहिती भरा.
8 / 11
सेक्युरिटी कोड व्यवस्थित टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करा. काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
9 / 11
मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर टाका. त्यानंतर Download Aadhaar या पर्यायावर क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड करा. हे पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड होईल.
10 / 11
डाऊनलोड केलेली ई आधारची पीडीएफ फाईल हि पासवर्ड प्रोटेक्टेड असेल. याचा पासवर्ड हा तुमच्या पत्त्यातील पिनकोड असणार आहे.
11 / 11
अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने ई-आधार कार्ड डाऊनलोड करता येते.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड