शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:53 PM

1 / 14
आधार कार्ड नाही नाही म्हणता आता महत्वाचा आणि प्रत्येकवेळी लागणारा दस्तावेज बनला आहे. यामुळे हे आधारकार्ड आता खिशातच ठेवावे लागत आहे. सुरुवातीला पलॅस्टिकचा मुलामा असलेले आधार कार्ड जपायचे म्हणजे खूप जिकिरीचे बनले होते.
2 / 14
यानंतर लोकांनी प्लॅस्टिकचे आधारकार्ड बनवून घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते वैध नव्हते. यामुळे आता युआयडीएआयनेच (UIDAI) पीव्हीसी आधार कार्ड (Aadhaar PVC card) देण्यास सुरुवात केली आहे.
3 / 14
हे पीव्हीसी आधार कार्ड बँकेच्या एटीएम कार्डसारखेच असणार आहे. यामुळे तुम्ही ते आरामात पर्समध्ये ठेवू शकता. ना भिजायचे टेन्शन ना फाटायचे टेन्शन, असे हे नवे आधारकार्ड असणार आहे. आता हे आधार कार्ड कसे मागवायचे असा प्रश्न पडला असेल ना....चला पाहुया.
4 / 14
पीव्हीसी आधारकार्ड मिळविण्यासाठी केवळ ५० रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरचीही गरज नाही. एकाच मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपूर्ण कुटुंबाचे पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकणार आहात.
5 / 14
स्टेप 1. तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
6 / 14
स्टेप 2. आता 'My Aadhaar Section' मध्ये 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा
7 / 14
स्टेप 3. इथे तुम्हाला 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकावा लागेल.
8 / 14
स्टेप 4. यानंतर तुम्हाला वेबसाईटवर दिसणारा सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड अचूक टाकावा लागेल.
9 / 14
स्टेप 4. यानंतर तुम्हाला वेबसाईटवर दिसणारा सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड अचूक टाकावा लागेल.
10 / 14
स्टेप 5. आता तुम्ही सेंड ओटीपी 'Send OTP' वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
11 / 14
स्टेप 6. तुम्हाला आलेला ओटीपी सबमिट करा. नॉन रजिस्टर मोबाईल नंबरसाठी तुम्हाला 'My Mobile number is not registered' वर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर नसलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर “Send OTP” वर क्लिक करावे लागेल.
12 / 14
स्टेप 7. आता तुम्हाला PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल.
13 / 14
स्टेप 8. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून ५० रुपये भरावे लागतील.
14 / 14
स्टेप 9. पैसे भरल्यानंतर तुम्हाला नवीन Aadhaar PVC Card पाठविले जाणार आहे.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड