शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! अवघ्या 20 व्या वर्षी 'त्याने' कमावले 1200 कोटी; कोरोनात सुरू केला 'हा' बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:30 PM

1 / 13
साधारणपणे 20 वर्षे हे शिक्षणाचे वय असते. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आपल्या करिअरचा विचार करू लागतो. पण लहान वयात 1200 कोटी रुपये कमावणाऱ्या मुलाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आदित पालिचा असं या तरुणाचं नाव आहे.
2 / 13
आदित पालिचा त्या कंपनीचा सीईओ आहे, ज्याचे 2022 मध्ये व्हॅल्यूएशन 900 मिलियन डॉलर म्हणजेच 7300 कोटी पार केले. विशेष बाब म्हणजे अवघ्या एका वर्षात या मुलाने आपल्या मित्रासोबत कोट्यवधींची कंपनी स्थापन केली.
3 / 13
ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zepto 2021 मध्ये लाँच करण्यात आलं. 2001 मध्ये मुंबईत जन्मलेल्या आदित पालिचा याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी एंटरप्रेन्योरशिपला सुरुवात केली. त्याने GoPool नावाचा स्टार्टअप सुरू केला.
4 / 13
कम्प्यूटर इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला, परंतु स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले.
5 / 13
आदितने त्याचा मित्र कैवल्य वोहरा यांच्यासोबत एप्रिल 2021 मध्ये ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zepto सुरू केलं. स्टार्टअप सुरू केल्याच्या 1 महिन्याच्या आत, कंपनीचे व्हॅल्यूएशन 200 मिलियन डॉलर झाले.
6 / 13
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी 10 मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्यासाठी हा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांची संकल्पना खूप यशस्वी झाली. आदित पालिचाचा मित्र आणि कंपनीचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा याचीही गोष्ट अशीच आहे. दोघंही स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टॅनफोर्डमधून बाहेर पडले.
7 / 13
दोघांनी याआधी किरणकार्ट नावाचा स्टार्टअप सुरू केला होता, परंतु त्यांना त्यांचे उत्पादन बाजारात योग्य वाटले नाही म्हणून ते बंद केले. 2021 मध्ये, दोन्ही मित्रांनी मिळून Zepto सुरू केले. यासाठी, 2021 मध्ये, त्यांनी 86 किराणा दुकानांशी सहकार्य केले आणि 10 लाख ऑर्डर वितरित केल्या.
8 / 13
कंपनीच्या लॉन्चच्या 5 महिन्यांत, व्हॅल्यूएशन 570 मिलियन डॉलरवर पोहोचले. या यशासाठी आदित पालिचा आणि कैवल्य वोहरा या दोघांचा 30 वर्षांखालील एन्टप्रिन्योरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
9 / 13
सध्या Zepto भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीत 1,000 पर्यंत कर्मचारी काम करतात. हे प्लॅटफॉर्मवर 3,000 उत्पादनं वितरीत करते. यामध्ये फळे, भाजीपाला ते किराणा मालाचा समावेश आहे.
10 / 13
झेप्टोची खासियत म्हणजे क्विक डिलिव्हरी सर्व्हिस है. सहसा 10 ते 15-16 मिनिटांत डिलिव्हरी होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आदित पालिचाने कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली तर आणि कैवल्य वोहरा याने मुख्य चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरची जबाबदारी हाती घेतली. दोघांनी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसा उभा केला.
11 / 13
आपल्याला मोठे अपार्टमेंट, उत्तम दर्जाची आणि जलद वितरण सेवा हवी आहे याची जाणीव त्यांना संशोधनातून झाली. त्यांनी डार्क स्टोअर नावाच्या मायक्रो डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सेंटरद्वारे त्यांची सेवा सुरू केली. ग्राहकांना शक्य तितक्या लवकर माल पोहोचवला जावा, हा उद्देश होता. त्यासाठी सरासरी अंतर दोन किलोमीटरच्या आत ठेवण्यात आले होते.
12 / 13

13 / 13

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी