शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AAI Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती; १ लाख ४० हजारापर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 1:10 PM

1 / 8
AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एएआय म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर ४०० जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ जुलै २०२२ पर्यंत नोकरीसाठीचा अर्ज करू शकणार आहेत.
2 / 8
इच्छुक उमेदवार येत्या १५ जूनपासून अर्ज दाखल करू शकणार आहेत. यासाठी उमेदवारांना aai.aero या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येईल. १४ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
3 / 8
उमेदवाराचं १४ जुलै २०२२ पर्यंत वय २७ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर शासनाच्या निर्णयानुसार विविध जाती-जमातींसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. यानुसार एससी आणि एसटी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत तर ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
4 / 8
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच किमान प्रवीणता असणं आवश्यक आहे.
5 / 8
इच्छुक उमेदवारांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांना फक्त ८१ रुपये भरावे लागतील. तर PWD आणि AAI मध्ये एक वर्षाचं शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
6 / 8
ऑनलाइन परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना दस्तऐवज पडताळणी/ आवाज चाचणीसाठी बोलावलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर AAI वेबसाइटवर जाहीर केले जातील.
7 / 8
कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या अर्जदारांना दरमहा ४० हजार ते १ लाख ४० हजार पर्यंत वेतन दिलं जाईल.
8 / 8
अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिककरणाच्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वर भेट देऊन माहिती मिळवू शकता.
टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन