Act of God: Is home, car insured in case of earthquake damage? Do these two things…
देवाची करणी! घर, कारचे भूकंपात नुकसान झाल्यास विमा मिळतो का? या दोन गोष्टी करा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 1:29 PM1 / 7तुर्कीमध्ये गेल्या महिन्यात आलेल्या भूकंपात लाखो घरे उद्ध्व्स्त झालीत. कालची रात्र पास अफगाणिस्तानपासून ते चीनपर्यंतच्या पट्ट्याला हादरा देणारी ठरली आहे. सहा ते सात रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. आफ्टरशॉकही बसले आहेत. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 7जर भूकंपात घराचे, कारचे नुकसान झाले तर कोण भरून देणार? अॅक्ट ऑफ गॉड टर्म काय आहे... मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनी त्याचा क्लेम देते का, भारतात याबाबत काय नियम आहेत जाणून घेऊयात... 3 / 7काही काळापूर्वी भूकंपामुळे होणाऱ्या नुकसानीला अॅक्ट ऑफ गॉड समजले जात होते. यामुळे विमा कंपन्या क्लेम देत नव्हत्या. मात्र, आता काही कंपन्यांनी भूकंपापासून होणाऱ्या नुकसानीचे कव्हरेज देण्यास सुरुवात केली आहे. घराच्या विम्यापासून ते गाडीच्या विम्यापर्यंत हे कव्हरेज दिले जाते. 4 / 7भूकंपामुळे तुमच्या घराचे होणारे नुकसान खूप मोठे असू शकते आणि ते दुरुस्त करणे महागडे ठरू शकते. शिवाय तेवढे पैसे जवळ असणे देखील अशक्य असते. यामुळे गृह विमा पॉलिसीमध्ये भूकंपापासून संरक्षण असणे गरजेचे बनलेले आहे. भूकंपाच्या कव्हरेजमध्ये घरासोबतच त्यात ठेवलेले सामानही कव्हर केले जाते.5 / 7काही विमा कंपन्यांनी ही गरज ओळखून थोडा जास्तीचा प्रिमिअम आकारून 8 ते 10 कोटी रुपयांपर्यंतची घरे आणि त्यातील 40 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या साहित्यावर विमा देण्यास सुरुवात केली आहे. 6 / 7भूकंपावर कव्हरेज मिळत असले तरी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. भाड्याने घेतलेल्या मालमत्तेचे नुकसान, भूकंपानंतरच्या पुरामुळे घराचे अतिरिक्त नुकसान आणि तुमच्या घराच्या दुरुस्तीसाठी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार करत असाल तर विमा दिला जात नाही. 7 / 7कारसाठीही भूकंप कव्हर घेता येते. वाहनासाठी विमा पॉलिसी निवडताना ती पॉलिसी किंवा कंपनी भूकंपामुळ होत असलेले नुकसान कव्हर करते का ते एकदा तपासावे. हे कव्हर प्रामुख्याने थर्ड पार्टी कार इन्शुरन्स कव्हरेजमध्ये दिले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications