शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शब्द पाळला, १०८० एकर वनजमीन दत्तक घेतली अन् दिलं वडिलांचं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 8:17 PM

1 / 7
दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर यांच्या वाढदिवशी ग्रीन इंडिया चॅलेंजची प्रेरणा घेत १०८० एकर वनजमीन दत्तक घेत असल्याची घोषणा केली आहे. नागार्जुन यांनी दत्तक घेतलेल्या वनजमिनीला त्यांच्या वडिलांचं म्हणजेच अक्किनेनी नागेश्वर राव यांचं नाव दिलं आहे.
2 / 7
नागार्जुन यांच्या वडिलांच्या नावानं हैदराबादच्या सीमेवरील चेंगिचेरला वन क्षेत्रात एक अर्बन पार्कची निर्मिती केली जाणार आहे. नुकतंच त्यासाठीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी नागार्जुन यांच्यासोबत खासदार जे.संतोष कुमार यांच्यासह नागर्जुन यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. वन क्षेत्र विकाससाठी नार्गाजुन यांनी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार हरित निधी म्हणून २ कोटींची मदत धनादेश स्वरुपात दिली आहे.
3 / 7
खासदार संतोष कुमार यांनी आपल्या राज्य आणि देशात पर्यावरण संरक्षणाला महत्व देत ग्रीन इंडिया चॅलेंजला सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभाग घेऊन मीही वृक्षारोपण केलं असल्याचं नागार्जुन यांनी सांगितलं. बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये नागार्जुन यांनी महाअंतिम सोहळ्यात खासदार संतोष कुमार यांच्यासोबत वनभूमी मुद्द्यावर काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच वनजमीन दत्तक घेणार असल्याचंही म्हटलं होतं.
4 / 7
अर्बन वन पार्कसाठीच्या भूमिपूजनाचं भाग्य लाभलं याबद्दल अतिशय आनंदी असल्याचं नागार्जुन यांनी यावेळी म्हटलं. हे वन क्षेत्र पार्क कॉलोनीत राहणाऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे, असंही नागार्जुन म्हणाले. नार्गाजुन यांच्या वडिलांच्या नावानं अर्बन पार्क स्थापन करण्यात येत असून येथील रिकाम्या जागेवर येत्या काळात १ लाख वृक्ष लागवड केली जाणार असल्याचं खासदार संतोष कुमार यांनी यावेळी म्हटलं.
5 / 7
हैदराबादजवळील एकूण १.५० लाख एकर जमीन येत्या काळात ग्रीन इंडिया मोहिमेशी जोडून घेतली जाईल आणि यासाठी मदत करण्यास पुढाकार घेणाऱ्या सर्व व्यावसायिक, उद्योगपती आणि संस्थांचं आम्ही स्वागत करतो असं संतोष कुमार म्हणाले
6 / 7
वृक्षारोपण आणि अर्बन वन पार्कच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विशेष मुख्य सचिव शांता कुमारी, पीसीसीएफ आर. शोभा, पीसीसीएफ (एसएफ) आरएम डोबरियाल, राचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत, हैदराबादचे मुख्य संरक्षक एमजे अकबर, मेडचेल वन अधिकारी व्यंकटेश्वरलु, जीआयसीचे सह संस्थापक राघव, अभिनेते नागार्जुन आणि त्यांचे कुटुंबीय सुश्री सुप्रिया यारलागड्डा, सुमंत, सुशांत, नागा सुशीला, लक्ष्मी, सरोजा, व्यंकट नारायण राव, ज्योत्स्ना, अनुपमा, आदित्य, संगीता, सागरिका व इतरांनी उपस्थिती लावली.
7 / 7
चेंगिचेरला वन ब्लॉक हैदराबाद वारंगल राजमार्गवर उप्पल-मेडिपल्ली क्षेत्रात आहे आणि १६८२ एकर वनभूमी आहे. नागार्जुन यांनी १००० हजार एकर जमीन दत्तक घेतली आहे. यातील एका भागावर अर्बन पार्कची निर्मिती केली जाणार आहे. तसंच वनक्षेत्राचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्बन पार्क मेडिपल्ली ते चेंगिचेरला, चेरलापल्ली आणि ईसीआयएल क्षेत्रातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
टॅग्स :bollywoodबॉलिवूड