शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताविरुद्ध नेपाळ सरकारच्या निर्णयाचं अभिनेत्री मनिषा कोईरालानं केलं जाहीर समर्थन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 7:25 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी नेपाळ सरकारनं जारी केलेल्या नव्या नकाशाचं उघडपणे समर्थन केले आहे. नेपाळच्या संसदेने या महिन्यात एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला ज्यामध्ये भारताच्या कालापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा अशी तीन क्षेत्रे समाविष्ट केली गेली. या क्षेत्रांवर नेपाळ आपला दावा सांगत आहे.
2 / 10
मे महिन्यात नेपाळने भारताच्या लिपुलेखमध्ये रस्ता तयार करण्यास आक्षेप घेतला होता. हा रस्ता भारतीय हद्दीतच तयार करण्यात आला होता, राजनीतीक चर्चेद्वारे सीमा विवाद सोडविण्यासाठी तो तयार असल्याचं भारताने म्हटले होते. दरम्यान, नेपाळने भारताच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला.
3 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी नेपाळचे सरकारच्या या पावलाचं समर्थन करत प्रादेशिक सार्वभौमत्व + राजकीय सार्वभौमत्व + आर्थिक सार्वभौमत्व = सार्वभौम देशाच्या या निर्णयाचे समर्थन करणारे ट्विट केले! या ट्विटनंतर एका ट्विटर वापरकर्त्याने नेपाळमधील परिस्थितीवर भाष्य करीत आहे का असे विचारले असता मनिषा यांनी याची पुष्टी दिली.
4 / 10
मनिषाने लिहिले, मला फक्त आश्चर्य वाटले होते की नेपाळ आज कुठे उभा आहे आणि भविष्यात या मोर्चांवर कोणत्या दिशेने पुढे जाणार.. आपल्याला भूतकाळ माहित आहे…मी ते चांगले किंवा वाईट आहे हे सांगत नाही, याचा फक्त विचार केला.
5 / 10
मनिषा कोईराला यांच्या ट्विटवर टीका होऊ लागली तेव्हा तिने स्पष्टीकरण दिले. माझी एक विनम्र विनंती आहे की, कृपया आपत्तीजनक व अपमानास्पद भाषा वापरू नका, या परिस्थितीत आपण एकमेकांच्या पाठीशी आहोत, आमची सरकारे हा प्रश्न सोडवतील. या काळात आपण सभ्यपणे वागू शकतो. मी पूर्णपणे आशावादी आहे.
6 / 10
यापूर्वीही मनिषाने नेपाळच्या नव्या नकाशाबद्दल आनंद व्यक्त केला होता. परराष्ट्रमंत्र्यांना टॅग करत त्यांनी ट्विट केले की, आमच्या छोट्या देशाचा अभिमान टिकवून ठेवल्याबद्दल धन्यवाद. तीन महान देशांमध्ये (भारत, चीन, नेपाळ) यांच्यात शांततापूर्ण आणि सन्माननीय संभाषणाची मी अपेक्षा करते
7 / 10
दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी या ट्विटबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहून भारत-नेपाळच्या संबंधात चीनला ओढू नका असा सल्ला दिला.
8 / 10
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी असे निवेदनात म्हटले आहे की, नेपाळने अशाप्रकारे नकाशाच्या अनावश्यक लढाईपासून दूर रहावे. नेपाळचे हे एकतर्फी पाऊल ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्यांनुसार नाही. मुत्सद्दी वाटाघाटीद्वारे दोन्ही देशांमधील सीमा विवाद सोडविण्याच्या परस्पर समंजसपणाच्या विरोधातही आहे. अशाप्रकारे, भारत कोणत्याही जमिनीवरील कृत्रिमरित्या दावे स्वीकारणार नाही.
9 / 10
मनिषा कोईराला अखेर नेटफ्लिक्सच्या मूळ चित्रपट मस्कामध्ये पडद्यावर दिसली होती. ती सध्या मुंबईत आई-वडिलांसोबत क्वारंटाईनमध्ये आहे. मनीषाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लॉकडाऊनमुळे तिला कर्करोगाशी झालेल्या लढाईची आठवण येते.
10 / 10
मात्र मनिषा कोईराला हिच्या ट्विटमुळे अनेक युजर्सने तिच्यावर स्वार्थी असण्याचा आरोप केला, तर काहींना ज्या देशात तिने आयुष्यभर काम केलं त्याच्याविरोधात बोलत आहे अशीही प्रतिक्रिया दिली.
टॅग्स :Manisha Koiralaमनिषा कोईरालाNepalनेपाळIndiaभारतchinaचीन