शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोंदीपेक्षा ६० ते ९० पट अधिक असू शकतात Omicron च्या केसेस; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 9:27 AM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची (Coronavirus Patients) संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येचा खाली येत असलेला आलेख आता पुन्हा वाढताना दिसत आहे. अनेकांना आता कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिअंटचीही (Omicron Variant) लागण होताना दिसत आहे.
2 / 10
दरम्यान, एका नोंद करण्यात येत असलेली संख्या ही कधीही सत्यतेच्या जवळ नाही. कारण वास्तविक संख्या ही ओमायक्रॉन संसर्गाच्या नोंद होत असलेल्या संख्येच्या तुलनेत ९० पटीपर्यंत अधिक असू शकते, असं मत एका सरकारच्या ज्येष्ठ तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
3 / 10
'डेल्टा व्हेरिअंटच्या लाटेनंतर जे या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ती ओमायक्रॉनची आहे. ज्या प्रकारे तुम्ही याची चाचणी करा किंवा याची पुष्टी करा, परंतु या ठिकाणी याची पुष्टी करण्याची गरज नाही,' असं मत आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी व्यक्त केलं.
4 / 10
जेव्हा याचा आलेख घसरू लागेल तेव्हा आपल्याला हा अखेरपर्यंत पोहोचत असल्याचं समजेल, असंही ते म्हणाले. डॉ. मुलियाल यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केलं.
5 / 10
तज्ज्ञ अधिक चाचण्या आणि योग्य संख्येशिवाय ओमायक्रॉनची वास्तविक मर्यादा कशी मापू शकतील असा सवालही त्यांना करण्यात आला. 'आपण आता त्याच्यासोबत जगणं शिकलो आहोत. डेल्टा व्हेरिअंटमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेदरम्यान तायम संख्येला प्रकरणांची वास्तविक संख्या मिळवण्यासाठी ३० पट केलं. कारण संसर्ग झालेल्या व्यक्तीसह सबक्लिनिकल संख्या कोणाच्याही लक्षात येत नाही,' असं ते म्हणाले.
6 / 10
ओमायक्रॉनसाठी ते म्हणाले की आम्ही ६० ते ९० वास्तविक प्रकरणांपैकी फक्त एक शोधत आहोत, कारण सबक्लिनिकल प्रकरणांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
7 / 10
यावेळी त्यांनी मुलियाल यांनी लॉकडाऊनवरही भाष्य केलं. 'आपण मोठ्या कालावधीसाठी घरात बंद राहू शकत नाही. डेल्टा व्हेरिअंटच्या तुलनेत ओमायक्रॉन हा सौम्य आहे यावर आपल्याला जोर दिला पाहिजे,' असंही ते म्हणाले.
8 / 10
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. या व्हायरसला रोखणे शक्य नाही. जवळपास प्रत्येकाला ओमायक्रॉनची लागण होणार आहे, असंही मुलियान यांनी नमूद केलं. कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
9 / 10
'ओमायक्रॉन हा एक आजार आहे ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्या संसर्ग कधी झाला? त्यामुळे याबाबतची मनातील भीती दूर करून या आजारासोबत जगायला आपण शिकले पाहिजे,' असं त्यांनी नमूद केलं.
10 / 10
कोरोनावरील लस (Coronavirus Vaccine) पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असं मतही डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी व्यक्त केलं.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस