पतेती - ‘पारशी नववर्ष’ By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 6:34 PM
1 / 11 आज पतेती…. पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात. पारशी वर्षारंभ दिनाला ‘नवरोज’ म्हणतात. 2 / 11 पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो. 3 / 11 वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात 4 / 11 नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. पंचमहाभूतांची देखील पूजा होते 5 / 11 पारशी समाजाचे दैवत म्हणजे ‘अग्निदेव’ व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत (दत्ता खेडेकर) 6 / 11 चैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो (दत्ता खेडेकर) 7 / 11 पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात (दत्ता खेडेकर) 8 / 11 या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते(दत्ता खेडेकर) 9 / 11 गेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घेत, नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते (दत्ता खेडेकर) 10 / 11 आजच्या दिवशी शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात (दत्ता खेडेकर) 11 / 11 सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान केले जातात (दत्ता खेडेकर) आणखी वाचा