शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:46 PM

1 / 11
अफगानिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यानंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. जगभरातही दोन गट पडले असून एक तालिबानच्या बाजुने तर दुसरा विरोधी झाला आहे. परंतू तुम्हाला माहितीये का, कधी काळी अफगानिस्तान हा एका भारतीय राजाच्या राज्यात होता. होय, हे खरे आहे.
2 / 11
कबीला संस्कृतीच्या या देशाच्या इतिहासाची पाने पलटली तर या देशावर कधी काळी एका भारतीय शूरवीर राजाचे राज्य होते, हे दिसते. या राजाने लढाया न लढता, केवळ कुटनीतीच्या बळावर 500 हत्तींच्या साथीने अफगानिस्तानवर राज्य केले होते.
3 / 11
हा राजा होता, महाप्रतापी सम्राट चंद्रगुप्त मौर्य. या राजाने अफगानिस्तानला भारताच्या मातीशी जोडले होते. परंतू रक्तपात न करता, चंद्रगुप्त मौर्यांनी अफानिस्तान कसे जिंकले याची कहानी मोठी रंजक आहे.
4 / 11
दिल्ली विद्यापीठाचेइतिहास विभागाचे प्राध्यापक विजया लक्ष्मी सिंह यांनी याची माहिती दिली आहे. भारत- अफगानिस्तानचे संबंध खूप जुने आहेत. काही इतिहासकार हे या संबंधांना सिंधु संस्कृतीशी देखील जोडतात. प्राचीन काळात शोर्तुगई ट्रेड कॉलोनीमध्ये आमू दरिया (अफगानिस्तानातील नदी) होती. उत्तरेकडील अफगानिस्तानात येथे पुरातत्व सिंधु कॉलनी होती, जी व्यापारासाठी वापरली जात होती.
5 / 11
जस्टिन आणि ग्रीक रोमन इतिहासकार प्लूटार्क यांनी चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांच्यातील असलेल्या संबंधांबाबतही उल्लेख केला आहे. अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस याने कंधारपर्यंत भाग जिंकला होता आणि पश्चिमी भारताच्या सीमेपर्यंत धडक दिली होती.
6 / 11
चंद्रगुप्त मौर्य यांनी देखील तातडीने या सीमेवर धाव घेतली आणि दोघांमध्ये युद्ध झाले. हे युद्ध एका समझोत्यावर संपले. यानुसार 305 ईसा पूर्वमध्ये सेक्युलसने चंद्रगुप्त मौर्य यांना अफगानिस्तान सोपविला होता. यानंतर मौर्य साम्राज्य आणि प्राचीन ग्रीक साम्राज्यामध्ये राजनैतिक संबंध कायम झाले होते.
7 / 11
विजया यांनी सांगितले की, ग्रीक साम्राज्याने कंधारसह अफगानिस्तानच्या दुसऱ्या भागांमध्ये मौर्य साम्राज्याचा स्वीकार केला होता. मैत्रीच्या नात्याने चंद्रगुप्त मोर्य यांनी 500 हत्ती, सेवेकरी, सामग्री आणि धान्य युनानला पाठविले होते.
8 / 11
ग्रीक (यूनान) चे राजदूत मेगास्थनीज हे मौर्य यांच्या दरबारात नियुक्त झाले. मेगास्थनीज यांनी मोर्य यांच्यावर एक पुस्तकही लिहिले. याद्वारे तेव्हाची माहिती मिळते.
9 / 11
काही जणांच्या तर्कानुसार सेल्युकसने त्याची मुलगी हेलेनचा विवाह चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी केला. मात्र, याची अधिकृत माहिती मिळत नाही.
10 / 11
पटनाचे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रोफेसर राजीव सांगतात की, तालिबानने ज्या भागावर कब्जा केला आहे तो, इतिहासात कंदाहरचा भाग होता. तेव्हा कंदाहरची राजधानी तक्षशिला होती. सध्या तक्षशिला ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडीमध्ये आहे.
11 / 11
तक्षशिला येथेच चंद्रगुप्त मोर्य यांनी चाणक्य यांच्याकडून शिक्षण घेतले होते.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान