शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 6:54 PM

1 / 8
Dwarka Yashobhumi: आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यातील अनेकांची कामेही पूर्ण झाली आहेत. अलीकडेच दिल्लीतील प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या 'भारत मंडपम'ची चर्चा जगभर रंगली. G-20 शिखर परिषदेचे आयोजन यातच झाले होते. आता द्वारकात इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर बांधले जात आहे, ज्याला 'यशोभूमी' असे नाव देण्यात आले आहे.
2 / 8
17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यशोभूमीचे पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे केंद्र जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल.
3 / 8
तयार झाल्यानंतर 'यशोभूमी' जगातील सर्वात मोठ्या MICE सुविधांमध्ये स्थान घेईल. 'यशोभूमी' एकूण 8.9 लाख चौरस मीटर क्षेत्रात बांधण्यात येत असून, त्यापैकी 1.8 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
4 / 8
यशोभूमीमध्ये मुख्य सभागृह तसेच ग्रँड बॉलरुमसह 15 अधिवेशन कक्ष आणि 13 मीटिंग हॉलचा समावेश आहे. एकूण 11,000 प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था आहे. यावरून याची क्षमता मोजता येते. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठा LED मीडिया फेस देखील आहे. या सेंटरच्या मुख्य सभागृहात एकाच वेळी 6000 पाहुणे बसू शकतात.
5 / 8
सभागृहाच्या बाजूला भव्य बॉलरूम बांधण्यात आली असून, त्यात एकाच वेळी सुमारे 2500 पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था आहे. यासोबतच उर्वरित जागा खुली ठेवण्यात आली असून त्यात किमान 500 लोक बसू शकतील. या आठ मजली इमारतीत 13 मीटिंग हॉल बांधले जातील, जेथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका होतील.
6 / 8
यात एका विशाल प्रदर्शन हॉलचाही समावेश आहे. 1.07 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधण्यात आलेला हॉल, व्यापार मेळे आणि व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वापरला जाईल.
7 / 8
छतामध्ये तांब्याचा वापर केल्यामुळे लोकांना येथे नवीन प्रकारची रचनाही पाहायला मिळेल. यासोबतच मीडिया रूम, व्हीव्हीआयपी लाउंज, व्हिजिटर इन्फॉर्मेशन सेंटर, तिकीट सेंटर आदी सुविधाही उपलब्ध असतील.
8 / 8
द्वारका सेक्टर 25 मध्ये नव्याने बांधलेल्या या सेटंरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर यशोभूमी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाईनशीही जोडली जाईल. पुढे जाऊन, दिल्ली मेट्रो विमानतळ एक्सप्रेस लाईनवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनचा वेग ताशी 90 ते 120 किमी पर्यंत वाढवेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. नवी दिल्ली ते यशोभूमी आणि द्वारका सेक्टर 25 हे अंतर कापण्यासाठी फक्त 21 मिनिटे लागतील.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीG20 Summitजी-२० शिखर परिषदBJPभाजपा