After Covid Vaccination Nurse tested Positive in Corona Report at MP
Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली By प्रविण मरगळे | Published: January 20, 2021 2:18 PM1 / 11गेल्या वर्षभरात कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले, यातील लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला, तर कोरोना संपुष्टात येण्यासाठी संशोधकांनी दिवसरात्र मेहनत घेतली. 2 / 11वैज्ञानिकांच्या मेहनतीला यश आलं, अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे, भारतातही १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 3 / 11इतर देशांनाही भारत कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे, याची सुरुवात भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशपासून होणार आहे. भारत बुधवारी बांगलादेशला २० लाख लसींचे डोस पाठवणार आहे. हे डोस सीरम इन्स्टिट्युटने उत्पादन केलेल्या कोविशिल्डचे असतील. मिळालेल्या माहितीनुसार भारत हे डोस सद्भावना म्हणून पाठवणार आहे.4 / 11दरम्यान, लसीकरणासाठी सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. लस घेतल्यापासून आतापर्यंत ५४१ लोकांना त्याचे दुष्परिणाम झाले आहेत. 5 / 11लसीकरणाचे साइड इफेक्ट पाहता सीरमनं आणि भारत बायोटेकने मार्गदर्शिक सूचना काढत कोणी ही लस घेऊ नये याबाबत सूचना केली आहे. आपल्याला कोणतीही औषधे, खाद्यपदार्थाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एलर्जी असल्यास कोविशिल्ड अजिबात टोचू नका. आपल्याला ताप किंवा सर्दी असल्यास लस घेऊ नका असं बजावण्यात आलं आहे. 6 / 11जर एखादी महिला गर्भवती असेल किंवा मुलं होण्याचं प्लॅनिंग करत असेल, स्तनपान देणाऱ्या आईनेही कोविशिल्ड लसीचा डोस घेऊ नये, जर आपण कोविड विरूद्ध लस आधीच घेतली असेल तर आपल्याला कोविशिल्ड टोचण्याची गरज नाही असं सांगण्यात आलं आहे. 7 / 11कोरोना लसीकरण आल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर दुसरीकडे लस घेऊन आलेल्या अनेकांमध्ये लसीचे दुष्परिणाम समोर आले आहेत. विविध लोकांवर कोरोना लसीचे परिणाम जाणवू लागले आहेत. 8 / 11मध्य प्रदेशातील मंडला येथे कोरोना लसीकरण दिल्यानंतर नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट येण्याच्या एक दिवस आधीच नर्सचं कोरोनाची लस टोचली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. 9 / 11नर्स जिल्हा हॉस्पिटलमध्ये कामाला होती, काही दिवसांपूर्वी नर्सची तब्येत ढासळली होती, सर्दी आणि तापाची समस्या झाल्याने नर्सने कोरोना चाचणी केली, या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं आहे. 10 / 11नर्सला कोरोनाची लस टोचण्यात आली होती, तब्येत बिघडली असल्याने तिची चाचणी करण्यात आली होती, ज्या दिवशी कोरोना लस टोचली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल आला, यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं अशी माहिती हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर विजय मिश्रा यांनी सांगितले. 11 / 11डॉक्टर विजय मिश्रा म्हणाले की, जिल्हा हॉस्पिटलमधील एका नर्सला कोरोनाची लस देण्यात आली होती, तिची तब्येत बरी झाली नाही. म्हणून चाचणी केली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, आता नर्सला फक्त १ डोस दिला आहे, प्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर दुसरा डोस दिला जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications