By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 15:33 IST
1 / 8राजधानी दिल्लीत हवेच्या प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खूप खालावली असून विषारी हवेमुळे यमुना नदीवर असा विषारी फेस दिसून येत आहे. 2 / 8धक्कादायक बाब अशी की यमुनेच्या पात्रात अशा विषारी फेसातच छठ पूजेनिमित्त भाविक नदीत स्नान करत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच याच विषारी पाण्यात सुर्याला अर्घ्य अर्पण आणि पूजा करण्याची नामुष्की भाविकांवर ओढावली आहे. 3 / 8छठ पूजेच्या निमित्तानं यमुना नदी काठची दृश्य व्हायरल होण्याचं हे काही पहिलं वर्ष नाही. पण यावेळी चित्र अधिक भयंकर दिसून येत आहे. यमुनेच्या पाण्यातील प्रदूषणाचा स्तर वाढत असल्यानं दिल्ली सरकार देखील चिंतेत आहे. 4 / 8दिल्लीत दिवाळीनंतर वायू प्रदुषणासोबतच आता जल प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. यमुनेच्या पाण्यात अमोनियाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कारखाने, रंगकाम उद्योग, धोबी घाट आणि नदीकाठीतील वस्त्यांमध्ये घराघरात वापरली जाणारी डिटर्झंट पावडर यामुळे यमुनेच्या पाण्यात फॉस्फेटचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जातं. 5 / 8अमोनिया आणि फॉस्फेटच्या अतिप्रमाणामुळेच यमुनेत विषारी फेस तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीतील डिटर्जंट निर्मिती कारखान्यांकडून दूषित पाणी यमुना नदीत सोडलं जातं. डिटर्जंट निर्मितीत फॉस्फेट आणि आम्लाचं प्रमाण अधिक असल्यानं फेस तयार होतो. यामुळेच यमुना नदीत फेस तयार होत आहे. 6 / 8औद्योगिक कचऱ्यामुळेच यमुनेचं पाणी विषारी होत आहे. या विषारी फेसामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. यातच जर अशा पाण्याचा उपयोग अंघोळीसाठी केला गेला तर ते अधिक घातक ठरू शकतं. 7 / 8दरम्यान, भाविकांकडून या सर्व धोक्यांकडे दुर्लक्ष केलं जात असून छठ पूजेच्या निमित्तानं याच विषारी पाण्यात स्नान करण्यासाठी भाविक आले होते. छठ पूजेच्या दिवशी याच विषारी पाण्यात अनेक भाविकांनी डुबकी घेतली. कांलिदी कुंज परिसरातील ही दृश्य आहेत. 8 / 8यमुनेच्या विषारी पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातून एका साथरोगाची उत्पत्ती झाली तर दिल्लीसाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात देखील अशाच पद्धतीनं यमुनेचं पात्र खूप दूषीत झालं होतं.