After Pakistan China not to attend NSA meeting chaired of Ajit Doval hosted by India on Afghanistan
१० नोव्हेंबरला भारत उचलणार मोठं पाऊल, जगाचं लक्ष; पाकिस्तानसह चीनही मागे हटलं By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 3:40 PM1 / 10अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं Taliban) कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात अनेक देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असण्याची शक्यता आहे. 2 / 10अफगाणिस्तानातील परिस्थितीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीचं सर्व देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु या बैठकीत निमंत्रण मिळूनही पाकिस्तानपाठोपाठ आता चीननेही सहभाग घेण्यास नकार दिला आहे.3 / 10चीनचं म्हणणं आहे की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरील चर्चेत ते सहभागी होणार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांनुसार चीनने भारताने पाठवलेल्या निमंत्रणावर भाष्य केले आहे. या बैठकीची वेळ नियोजित कार्यक्रमात बसत नसल्याचं कारण चीनने दिले आहे.4 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारतासोबत बहुपक्षीय आणि द्विपक्षीय चर्चेसाठी तयार आहे. परंतु ही वेळ योग्य नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे चीनचा मित्र पाकिस्ताननेही भारताचं निमंत्रण फेटाळलं आहे. 5 / 10पाकिस्तानचा निर्णय दुर्दैवी आहे परंतु आश्चर्यकारक नाही. अफगाणिस्तानला पाकिस्तानचा तारणहार पाहण्याची मानसिकता यातून दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे. या संमेलनात इराण, रशिया, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, तुर्केमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील.6 / 10या बैठकीला अफगाणिस्ताला निमंत्रण न देण्यावरुन सांगितले गेले की, बैठकीत सहभागी होणाऱ्या ८ देशांपैकी कुणीही अफगाणिस्तानात तालिबानी सरकारला मान्यता दिली नाही. भारतानेही अद्याप तालिबानी सरकारला मान्यता दिली नाही. त्यासाठी अफगाणिस्तानला बैठकीचं आमंत्रण पाठवण्यात आले नाही.7 / 10NSA पातळीवरील या संमेलनात(NSA Level Regional Conference on Afghanistan) फक्त अफगाणिस्तानशी सलग्न असलेल्या देशांनाच नव्हे तर आशियाई खंडातील अन्य देशांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. 8 / 10या संमेलनाचं अध्यक्ष भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल(Ajit Doval) असतील तर संमलेनाचं आयोजन १० नोव्हेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. बैठकीसाठी रशिया, इराण, मध्य पूर्व आणि मध्य आशियातील देशांनी सहभाग घेणार असल्याचं सांगितले आहे.9 / 10यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये इराणने अशाप्रकारच्या संमेलनाचं आयोजन केले होते. पाकिस्तानने त्यातही सहभाग घेतला नव्हता. चीनने त्या संमेलनात भाग घेतला होता. उद्या भारतात होणाऱ्या या संमेलनात सहभागी असणारे विविध देशांचे NSA भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचीही भेट घेणार आहेत10 / 10दरम्यान, चीनमध्ये सध्या वेगळीच चर्चा सुरु आहे. याठिकाणी चीन तैवानसोबत युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे चीनने अलीकडेच नागरिकांना अत्यावश्यक सामानांचा साठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता चीनमधील सुपर मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications