शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:55 AM

1 / 10
अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने आधीच चिंतीत असलेल्या चीन आणि पाकिस्तानचे टेन्शन आता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे भारत आता अमेरिकेकडून एक असे लढाऊ विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे जे कुठल्याही क्षणी शत्रूची दाणादाण उडवू शकते.
2 / 10
चीन आणि पाकिस्तान भारताला दोन बाजूंनी घेरण्याचे कटकारस्थान आखत आहेत. तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने राफेलनंतर हे लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखली आहे.
3 / 10
भारतीय हवाई दल अमेरिकेकेकडून एफ-१५ ईएक्स लढाऊ विमान खरेदी करण्याची शक्यता आहे. हे विमान तयार करणारी अमेरिकन कंपनी बोईंगने हे विमान भारताला देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता हा प्रस्ताव स्वीकारून भारताने हे विमान खरेदी केल्यास भारतीय हवाई दलाची ताकद कैकपटीने वाढणार आहे.
4 / 10
लढाऊ विमानांमध्ये हवेत होणाऱ्या डॉग फाइटमध्ये एफ-१५ ईएक्स लढाऊ विमान जगातील सर्वात संहारक विमान आहे. तसेच आतापर्यंत सहभागी झालेल्या मोहिमांमध्ये या विमानाने १०० टक्के यश मिळवलेले आहे. आतापर्यंत शत्रूचे कुठलेही विमान या विमानाची शिकार करू शकलेले नाही.
5 / 10
एफ१५ ईएक्स हे लढाऊ विमान २.५ मॅक म्हणजेच सुमारे तीन हजार किमी प्रतितास वेगाने शत्रू देशाच्या कुठल्याही भागात चढाई करून विध्वंस घडवून आणू शकते. तसेच आपल्यापासून शेकडो किमी दूर असलेले शत्रूचे विमान किंवा रडारला नष्ट करू शकते.
6 / 10
या विमानाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे विमान आपल्यासोबत १४ टन (१४ हजार किलोग्रॅम) वजनाची स्फोटके आपल्यासोबत नेऊ शकते. तसेच शत्रूच्या गोटात मोठा संहार घडवू शकते.
7 / 10
एफ-१५ ईएक्स विमानामध्ये डबल इंजिन जोडलेले आहे. ते अत्यंत शक्तिशाली आहे. तसेच अन्य विमानांच्या तुलनेत याला कमी इंधन लागते. या विमानाचा वेग आणि दारुगोळा नेण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे युद्धाच्या मैदानात हे विमान प्रभावी ठरू शकते.
8 / 10
हे विमान २२ एअर टू एअर क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकते. तसेच हायपरसोनिकसारखी विध्वंसक क्षेपणास्त्रे डागू शकते. या विमानाची रडार प्रणाती अत्यंत शक्तिशाली असून, त्यामुळे या विमानाला आपल्या लक्ष्याचा शोध त्वरित लागू शकतो. तसेच एकाचवेळी हे विमान अनेक लक्ष्यांचा भेद करू शकते.
9 / 10
अमेरिकेकडे एफ-३५ हे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान आहे. मात्र एफ-१५ ईएक्स अनेक बाबतीत त्याच्यावर वरचढ आहे. त्यामुळेच अमेरिकेनेही ८० एफ-१५ईएक्स विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे.
10 / 10
एफ-१५ ईएक्स हे एफ१५ विमानाची सुधारित आवृत्ती आहे. एफ-१५ चा इतिहाससुद्धा तितकाच प्रभावी असून, जगभरातील विविध लढायांमध्ये या विमानाने १०४ हून अधिक विमाने पाडली आहेत. मात्र या दरम्यान एकही एफ-१५ विमान कोसळलेले नाही. तसेच जगातील कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली या विमानाला भेदू शकलेली नाही.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतUnited StatesअमेरिकाRafale Dealराफेल डील