After the Surajpur truck accident in Chhattisgarh, locals stole cucumbers and fled from there
इथे माणुसकी हरली! टोमॅटो नव्हे काकड्या लुटल्यासाठी उडाली एकच झुंबड; लाखोंचे नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 3:13 PM1 / 10देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आहे. टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सर्वसामान्यांचं बजेट बिघडलं आहे. 2 / 10टोमॅटोचे भाव वाढल्याने इतर भाज्याही महाग होऊ लागल्या आहेत. अलीकडेच टॉमॅटो चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. असाच काहीसा विचित्र प्रकार छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातून समोर आला आहे. पण इथे लोकांनी टोमॅटो नाही तर काकडी लुटायला एकच गर्दी केली.3 / 10दरम्यान, छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी एका ट्रकचा अपघात झाला. काकड्यांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याने स्थानिकांनी गर्दी केली. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 / 10सध्या चालकाची प्रकृती ठीक आहे, पण स्थानिकांच्या एका कृत्यामुळे ट्रक चालकासह काकडी उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला. कारण अपघात पाहण्यासाठी आलेल्या स्थानिकांनी काकडी लुटण्यासाठी तोबा गर्दी केली.5 / 10उत्तर प्रदेशातील बनारस भाजी मंडईकडे जात असताना या ट्रकला अपघात झाला. सूरजपूरच्या अंबिकापूर बनारस रोडवरील कापसरा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला अन् सर्वत्र काकड्यांचे साम्राज्य तयार झाले. 6 / 10लक्षणीय बाब म्हणजे ट्रकमध्ये लाखो रुपयांची काकडी भरलेली होती. पलटी झालेल्या ट्रकमध्ये काकडी दिसताच स्थानिक ग्रामस्थ व ये-जा करणाऱ्यांनी संधीचा फायदा घेत काकडी लुटण्यास सुरुवात केली.7 / 10स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने ट्रक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. 8 / 10पण, पोलीस येण्यापूर्वीच काही लोकांनी काकडी घेऊन पळ काढला होता. मात्र, अद्याप काकडी चोरी किंवा लुटीची कोणीही तक्रार केलेली नाही.9 / 10आताच्या घडीला देशात टोमॅटोपासून सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत ट्रक अपघातातील काकडी पाहून अनेकांनी लूट केली. 10 / 10भाज्यांच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वांनाच बसत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याचाच प्रत्यय या अपघातातून आल्याचे पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications