शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:07 PM

1 / 6
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात एका भाजपा आमदाराच्या गुंडगिरीमुळे एका तरूणाला पोलीस संरक्षणात लग्नाचे फेरे घ्यावे लागले.
2 / 6
भाजपाचे विधायक अरविंद रैयाणी यांनी तरूणाकडे 10 लाख रूपयांची खंडणी मागितली होती.
3 / 6
खंडणीचे पैसे न दिल्यास तुझं लग्न मोडेन, अशी धमकी अरविंद रैयाणी यांनी तरुणाला दिली होती.
4 / 6
धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने लग्नाची वरात घेऊन थेट पालिका आयुक्त अनुपम सिंह यांचे कार्यालय गाठले आणि त्यांना सारा प्रकार सांगितला.
5 / 6
तरूणाची बाजू ऐकल्यानंतर आयुक्तांनी त्याला पोलीस सुरक्षा पुरविली. त्यानंतर या तरूणाने पोलीस संरक्षणात लग्नाचे फेरे घेतले.
6 / 6
अरविंद रैयाणी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खंडणीचा आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे रैयाणी यांनी सांगितले.
टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार