After visiting Tulja Bhavani, Indira Gandhi asked the officer for an answer
तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी 'त्या' अधिकाऱ्याला जाब विचारला By महेश गलांडे | Published: November 19, 2020 2:20 PM1 / 11देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी होत असून दिग्गजांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही त्यांच्या आठवणी जागवत त्यांना अभिवादन करण्यात येत आहे2 / 11महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिशक्ती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेताना प्रियदर्शनी इंदिरा गांधी. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. 3 / 11इंदिरा गांधी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्या तुळजापूरला तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेल्या. विशेष म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री असणाऱ्या इंदिरा गांधींनाही देवीच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागली होती. 4 / 11इंदिराजी मंदिरात देवीचे दर्शन करून ज्यावेळी बाहेर आल्या तेव्हा त्यांचे लक्ष मंदिराच्या शिखराकडे गेले. मंदिराच्या शिखराला रंगरंगोटी करण्यात आल्याचे पाहून त्यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याला बोलावले आणि 'तुम्ही मंदिराचा प्राचीन चेहरामोहरा का बदलला ?' असा जाब विचारला. तेव्हा अधिकाऱ्याची पाचावर धारण बसली. तेव्हापासून मंदिराची मूळ ओळख कायम ठेवूनच इतर विकासकामे केली जातात.5 / 11महाराष्ट्र काँग्रेसने आज ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या तुळजापूर भेटीचा आणि तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा फोटो शेअर करता आठवणी जागवल्या आहेत. 6 / 11आपल्या कणखर नेतृत्वाद्वारे देशासाठी पुरोगामी व लोककल्याणकारी निर्णयांची अंमलबजावणी करणाऱ्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. आपले राजनैतिक कौशल्य आणि धाडसी निर्णयक्षमतेमुळे देशाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. 7 / 11काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आयर्न लेडी असं संबोधित देशातील विविध खात्याची जबाबदारी समर्थपणे निभावणाऱ्या इंदिरा गांधींनी अभिवादन केलंय. 8 / 11 माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नाशिक शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून इंदिराजींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात9 / 11 देशाच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न, स्वर्गीय इंदिरा गांधींनी सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या एकजुटीतून एक मजबूत, हिंसाचारमुक्त भारत घडविण्याचं स्वप्नं बघितलं होतं. इंदिराजींचं ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय इंदिराजींच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.10 / 11इंदिराजी गांधींच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ घेत राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.11 / 11मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications