By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:56 IST
1 / 8पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर पहिली खासगी तत्वावरील तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. 2 / 8ही तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धावणार आहे.3 / 8शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसला (Ahmedabad Mumbai Tejas Express) अहमदाबादमध्ये हिरवा झेंडा दाखविला. 4 / 8रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे.5 / 8दिल्ली ते लखनऊ तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी गाडी 4 ऑक्टोबर 2019 रोजी धावली होती. त्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद ही तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. 6 / 8तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा आहेत.7 / 8तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुंदरी आणि रेल्वे कर्मचारी हे गुजराती वेशभूषेत दिसणार आहेत. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरकडून ही वेशभूषा तयार करून घेण्यात आली आहे.8 / 8तसेच, तेजस एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्रीय आणि गुजराती थाळी मिळणार आहे. यामध्ये गुजराती डाळ, गुजराती कढी, लसनिया बटाटा भाजी, फाफडा, जिलेबी असे गुजराती पदार्थ मिळणार आहेत. याशिवाय, मांसाहारी पदार्थांसह बटाटा भाजी, बटाटावडा, कोथिंबिर वडी, श्रीखंड, कांदेपोहे अशा महाराष्ट्रीय पदार्थांची चवही चाखता येणार आहे.