ऐ मेरे वतन के लोगो... हे अजरामर गीत कोणी आणि कधी लिहलं? घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:12 AM
1 / 10 देशभक्तीपर गीत म्हटलं की, ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंख मे भरलो पाणी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी... ह्या गाण्याचा उल्लेख आल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. 2 / 10 देशाचा स्वातंत्र्य दिन असो, प्रजासत्ताक दिन असो किंवा वीर जवानांच्या सन्मानार्थ असलेला शहीद दिवस असो, कारगिल दिवस असो ऐ मेरे वतन के लोगो.. हे गाणं ऐकायला मिळतचं. 3 / 10 शाळा असो किंवा एखादी संस्था, ग्रामपंयात असो किंवा संसद, गल्ली असो वा दिल्ली हे गाणं ऐकला नाही, असा भारतीय नागरिक सापडणार नाही. म्हणूनच, हे गीत अजरामर झालंय, असंच म्हणता येईल. 4 / 10 विशेष म्हणजे काळानुसार अनेक गाण्यांची लोकप्रियता कमी होते, पण हे गाणं आजही तितक्याच आवडीने आणि भावनांनी ऐकलं जातं. उलट या गाण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे 5 / 10 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंख मे भरलो पाणी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी... हे लोकप्रिय गीत कवि प्रदीप यांनी लिहिलं होतं. तर, सी रामचंद्रा यांनी संगीतबद्ध केलं. 6 / 10 कवि प्रदीप हे उत्तर प्रदेशच्या लखनौचे होते, त्यांनी केवळ ५ ते ६ वर्षे कविता केली. माझं कवि म्हणून आयुष्य मोठं नाही. पण, ह्या कवितांमुळेच माझा भाग्योदय झाला, असे कवि प्रदीप यांनी म्हटलंय. 7 / 10 भारत-चीनच्या युद्धानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत २६ जानेवारीचा कार्यक्रम होता, त्यासाठी मला गाणं लिहायचं होतं, तेव्हा आजचा दिवस शुभ आहे, पण त्या सीमारेषेवरील शहीदांचा स्मरण करायला हवं, असं म्हणत हे गाणं लिहिल्याचं कवि प्रदीप म्हणतात. 8 / 10 लता मंगेशकर यांनी आपल्या जादुई आवाजात हे गाणं गायलं होतं. सन १९६२ साली भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या वीरांचे स्मरण या गाण्यातून करण्यात आले आहे. 9 / 10 लता मंगेशकर यांनी सर्वप्रथम २७ जानेवारी १९६३ साली नवी दिल्ली येथील नॅशनल स्टेडियममध्ये हे गाणं गायलं होतं. त्यावेळी, तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. 10 / 10 लता दीदींनी गायलेलं गाणं ऐकून पंतप्रधान पंडित नेहरु हेही भावूक झालं होते. त्यांनीही लता दिदींच्या आवाजाचं आणि गाण्याचं कौतुक केलं होत. तेव्हापासून हे गाणं अजरामर गीत बनलंय. आणखी वाचा