Air India One, designed like US presidents' Air Force One for Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:42 PM1 / 11देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यांसाठी खास विमान तैनात करण्याची तयारी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नवे व्हीव्हीआयपी विमान तयार झाले आहे. हे विमान पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये दाखल होणार आहे. 2 / 11भारत सराकरने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग ७७७-३०० ईआर अशाप्रकारची दोन विमाने मागवली आहेत. यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी असेल. 3 / 11 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी हे व्हीव्हीआयपी विमान तयार करण्यात आले आहे. या दोन्ही विमानांची बांधणी अमेरिकेत करण्यात येत आहेत. ही विमाने ताफ्यात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामधून २५ वर्षे जुनी बोईंग ७४७ विमाने हटवण्यात येतील. तसेच या विमानांचे सारथ्य हे भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांकडून करण्यात येईल. 4 / 11 एअर इंडिया वन विमानाला भारतात आणण्यासाठी एअर इंडिया, भारताचे हवाई दल आणि सरकारमधील काही अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचे एक पथक अमेरिकेत गेले आहे. 5 / 11एअर इंडिया वन विमानामध्ये अॅडव्हान्स आणि सिक्योर कम्युनिकेशन सिस्टिम लावण्यात आले आहेत. ही विमाने पूर्णपणे एअर कमांडच्या रूपात काम करतात. या विमानांच्या अत्याधुनिक ऑडिओ-व्हिडीओ प्रणालीला टेप किंवा हॅक करता येत नाही. 6 / 11ही दोन्ही विमाने एका मजबूत किल्ल्याप्रमाणे असतील. त्यांच्या खरेदीवर तब्बल ८ हजार ४५८ कोटी रुपये खर्च येणार आहे. 7 / 11 एअर इंडिया वन विमानांमध्ये मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सेल्फ प्रोटेक्शन सूट आहे. ही प्रणाली शत्रूराष्ट्राच्या रडार फ्रिक्वेन्सीला जॅम करू शकते. 8 / 11एअर इंडिया वन विमानाच्या आत एक कॉन्फ्रन्स रूम, व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, एक मेडिकल सेंटर आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांसाठी आसनव्यवस्था असेल. 9 / 11 या विमानावर एअर इंडिया वनची खास साइन असेल. या साइनचा अर्थ विमानामधून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान प्रवास करत आहेत, असा असेल. 10 / 11एअर इंडिया वन विमानावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोकचक्रासह भारत आणि इंडिया असे लिहिलेले असेल. 11 / 11एअर इंडिया वन विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंधन भरल्यानंतर हे विमान सलग १७ तास उड्डाण करे. सध्या भारताच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामध्ये जी विमाने आहेत ती केवळ सलग १० तास उड्डाण करण्यात सक्षम आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications