शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या आहेत भारतातील सर्वात धोकादायक धावपट्ट्या, विमान उतरताना रोखला जातो श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 11:18 AM

1 / 8
केरळमधील कोझिकोड येथे काल रात्री मोठा विमान अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना घसरून हे विमान खाली असलेल्या उतरणीवर गेले. त्यादरम्यान या विमानाचे दोन तुकडे झाले. दरम्यान, या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 8
काल ज्या धावपट्टीवर अपघात झाला. त्या धावपट्टीचा टेबलटॉप धावपट्टीमध्ये समावेश होतो. अशा धावपट्टीवर विमान उतरवणे आव्हानात्मक असते. आज आपण जाणून घेऊयात भारतातील अशाच धोकादायक आणि विमान उतरताना अंगावर शहारे आणणाऱ्या धावपट्ट्यांविषयी.
3 / 8
२०१८ मध्ये सिक्कीमला आपला पहिला विमानतळ मिळाला होता. हा विमानतळ टेबलटॉप प्रकराचा विमानतळ आहे. येथील धावपट्टी समुद्रसपाटीपासून ४ हजार ५०० फूट उंचावर असलेल्या पाकयोंग गावाजवळ एका पर्वतावर आहे. हा विमानतळ २०१ एकर परिसरात पसरलेला आहे.
4 / 8
लडाखमधील कुशोक बाकुला रिमपोची विमानतळावर विमान उतरवणे हे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नाही, हा विमानतळ सर्वात जास्त उंचावर असल्याने जगात खूप चर्चित आहे. या विमानतळावरील धावपट्टी तब्बल ३ हजार २५९ मीटर उंचावर आहे. येथे धावपट्टी वगळता इतरत्र केवळ बर्फ आणि पर्वतच दिसतात.
5 / 8
मिझोराममधील लेंगपुई विमानतळाची धावपट्टी ही पर्वताच्या माध्यावर आहे. ही धावपट्टी समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंचावर आहे. हा विमानतळ भारतातील तीन टेबलटॉप विमानतळांपैकी एक आहे. विशेष बाब म्हणजे हा विमानतळ नद्यांच्या संगमावर आहे.
6 / 8
लक्षद्विपमधील अगाती विमानतळाचा समावेशही अत्यंत धोकादायक विमानतळांमध्ये होतो. हा विमानतळ अगाती बेटावरील दक्षिणेस वसला आहे. लक्षद्विपमध्ये ही एकमेव धावपट्टी आहे. तसेच तिची लांबी केवळ ४ हजार फूट आहे. येथील धावपट्टी खूप लहान असल्याने येथे विमान उतरवणे हे खूप आव्हानात्मक असते. हा विमानतळ पाहायला सुंदर असला तरी येथे उतरणे खूप जोखमीचे आहे.
7 / 8
हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे असलेल्या गग्गल विमानतळाची धावपट्टी ही खूप धोकादायक मानली जाते. १२०० एकर परिसरात बनलेल्या या विमानतळाची धावपट्टी २ हजार ४९२ फूट उंचावर आहे. येथे विमान उतरवताना झालेली लहानशी चूकसुद्धा मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.
8 / 8
अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी एका बेटावर आहे. ही धावपट्टी चहुबाजूंनी हिरवळीने आच्छादलेला आहे. त्यामुळे येथे विमान उतरवणे वैमानिकांसाठी आव्हानात्मक ठरते. येथे विमान उतरवणे खूप कठीण मानले जाते. कारण जेव्हा विमान खूप खाली येते तेव्हाच येथील धावपट्टी नजरेस पडते.
टॅग्स :AirportविमानतळairplaneविमानIndiaभारत