शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 1:47 PM

1 / 9
चंद्रयान ३ ने आता पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली आहे. काल श्रीहरीकोट्यावरून बाहुबली रॉकेट महत्वाकांक्षी यान घेऊन झेपावला होता. चंद्राच्या काळोख्या भागात चंद्रयान उतरणार आहे. हे यशस्वी झाले तर असे करणारा भारत पहिला देश ठरणार आहे. भारताने हे खूप आधीच केले असते, परंतू अमेरिकेने भारताच्या वाटेत काटे पेरलेले होते. यामुळे भारताला खूप संघर्ष करावा लागला आहे.
2 / 9
जवळपास तीन दशकांपूर्वी भारत अंतराळात आपले राज्य प्रस्थापित करू शकला असता. आज आपण ज्या अमेरिकेचा उदोउदो करतो ना, त्याच अमेरिकेने तेव्हा स्वत: मदत तर केलीच नाही परंतू इतर देशांनाही रोखले होते. तेव्हा भारत आणि अमेरिकेचे संबंध आजसारखे नव्हते. यामुळेच अमेरिकेने भारताविरोधात पाकिस्तानला अनेकदा मदतही केली होती. परंतू, भारताला मदत करणे काही अमेरिकेला जमत नव्हते.
3 / 9
अंतराळात जाण्यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञान गरजेचे होते. ते तंत्रज्ञान तेव्हा अमेरिका, रशिया, जपान आणि फ्रान्सकडे होते. काल जो बाहुबली झेपावला त्यातही क्रायोजेनिक इंजिन वापरलेले आहे. आकाशात झेपावताना खूप शक्ती लागते. त्यासाठी हे इंजिन उपयोगी असते. कालच्या यशाने अनेकांच्या मनात पुन्हा एकदा ती जखम ताजी झाली आहे.
4 / 9
एक रशिया सोडता भारताला हे तंत्रज्ञान देण्यास सर्व देशांनी नकार दिला होता. ९० च्या दशकात भारताचे शास्त्रज्ञ जिवतोडून मेहनत करत होते. रशियाने होकार देताच अमेरिकेने मोठी चाल खेळली. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा धाक दाखवून रशियाला देखील तंत्रज्ञान देण्यास रोखले होते. यासाठी अमेरिकेने इंटरनॅशनल मिसाईल टेक्ऩॉलॉजी कंट्रोल रिजीमच्या उल्लंघनाचा धाक दाखविला होता.
5 / 9
भारताची महत्वाकांक्षा पाहून अमेरिकेला आपण खुपत होतो. अमेरिका एवढ्यावरच थांबली नाही. त्याने इस्त्रो आणि रशियाच्या लाँच सर्व्हिस प्रोव्हायडर ग्लॅवकोमॉसवर प्रतिबंध लादले. तरीही भारताने या कंपनीकडून सात इंजिन खरेदी केले. याचा वापर जीएसएलव्ही रॉकेट लाँच करण्यासाठी केला गेला.
6 / 9
परंतू, इस्त्रोला स्वत:चे कायोजेनिक इंजिन हवे होते. यासाठी सर्व शक्ती, गुणवत्ता पणाला लावली गेली. अखेर २२ जुलै २०१९ ला इस्त्रोने एलव्हीएम ३ रॉकेटद्वारे चंद्रयान २ लाँच केले होते.
7 / 9
भारतीय अंतराळ संस्थेकडे पीएसएलव्ही रॉकेट होते. परंतु त्याला मर्यादा होती. ते फक्त 1.7 टन वजन वाहून नेऊ शकत होते. भारताने 2008 मध्ये चांद्रयान-1 आणि 2014 मध्ये मार्स ऑर्बिटर मिशन याच रॉकेटने पार पाडले होते. या यानांचे वजन दीड टनापेक्षा कमी होते.
8 / 9
क्रायोजेनिक इंजिनमध्ये अधिक जोर मिळतो. हायड्रोजन - 253 डिग्री सेल्सियस तापमानात आणि ऑक्सिजन -187 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवावे लागते. हे तापमान रॉकेटमध्ये ठेवणे खूप कठीण आहे. परंतू, अशा इंजिनशिवाय 3-4 टन वजनाचा पेलोड 36,000 किमी अंतरावरील जिओ ऑर्बिटमध्ये पाठविला जाऊ शकत नाही.
9 / 9
भारताला तेव्हाच हे क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान मिळाले असते, तर 90 च्या दशकातच अवकाशात भारताने वर्चस्व गाजविले असते. परंतू तेव्हा भारत अमेरिकेला खपत नव्हता. यामुळे भारताचा खरा शत्रू तेव्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अमेरिकाच होता.
टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चांद्रयान-3Americaअमेरिका