शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांसाठी तिनं घेतली भरारी; स्वाती रावत यांची कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:20 PM

1 / 12
इटलीत महिन्याभरापासून कोरोनानं थैमान घातलंय. चीनमधून पसरलेल्या कोरोनानं सर्वाधिक बळी इटलीमध्ये गेले आहेत.
2 / 12
इटलीत आतापर्यंत कोरोनामुळे ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
3 / 12
इटलीतील आरोग्य यंत्रणा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोरोनामुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून ती जवळपास कोलमडण्याच्या स्थितीत आहे.
4 / 12
अशा परिस्थितीत भारतातील २६३ जण इटलीत अडकून पडले होते. एअर इंडियाच्या विमानानं त्यांना मायदेशी आणण्यात आलं.
5 / 12
एअर इंडियाच्या पायलट स्वाती रावल यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
6 / 12
स्वाती रावल २२ कर्मचाऱ्यांसह एअर इंडियाचं विमान घेऊन रोमला गेल्या. तिथून २६३ भारतीयांसह त्या भारतात परतल्या.
7 / 12
एका मुलाची आई असलेल्या स्वाती यांना ज्यावेळी इटलीला जाण्याबद्दल विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला.
8 / 12
स्वाती आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन कौतुक केलं.
9 / 12
मुंबई ते न्यूयॉर्क जाणाऱ्या एअर इंडियाच्या बहुतांश विमानांमध्ये स्वाती रावत पायलट म्हणून काम करतात. या मार्गावर सेवा देणाऱ्या मोजक्या पायलट्समध्ये त्यांचा समावेश होतो.
10 / 12
स्वाती रावल गेल्या १५ वर्षांपासून विमान उड्डाण करताहेत.
11 / 12
भारतीय हवाई दलात काम करायचं स्वाती रावल यांचं स्वप्न होतं. मात्र काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी कमर्शियल पायलट होण्याचा निर्णय घेतला.
12 / 12
इटलीहून २६३ भारतीयांची यशस्वी सुटका केल्यानंतर स्वाती यांचं सोशल मीडियानं तोंडभरुन कौतुक केलंय.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटली