amphan super cyclone uproots trees and causes service disruption in odisha vrd
Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 1:24 PM1 / 16बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या शक्तिशाली चक्रीवादळ 'अम्फान'ने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम ओडिशाच्या किनारपट्टी भागात मंगळवारी रात्रीपासून दिसू लागला आहे. 2 / 16किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. बालासोर, भद्रक या जिल्ह्यांत वृक्ष उन्मळून पडण्याची नोंद आहे. भद्रक आणि पारादीप येथे मुसळधार पाऊस पडत आहे.3 / 16नदीकाठच्या 10 हजार लोकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. कच्च्या घरात राहणा-या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगितले आहे. 4 / 16संपूर्ण ओडिशामध्ये किनारपट्टी भागातील सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. 5 / 16त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, चक्रीवादळ सकाळी 10.30 वाजता पारादीपपासून 120 किमी अंतरावर होते.6 / 16हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीवरून जाण्याचा अंदाज आहे. आज दुपारपासून या चक्रीवादळाचा प्रभाव दिसण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. ओडिशा किना-यावरील भागात चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. 7 / 16मंगळवारपासून समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. किनारी जिल्ह्यांकडे हे वादळ ताशी 155 ते 165 किमीपर्यंत वेगानं सरकत आहे. जास्तीत जास्त वा-याचा वेग देखील 185 किमी प्रतितास असू शकतो. 8 / 16जोरदार वा-यामुळे ओडिशाच्या चांदबली येथे महामार्गावर अनेक झाडे कोसळली आहेत. सध्या या वादळाचा परिणाम ओडिशावर आहे. 9 / 16वादळ आणि पावसाच्या दरम्यान भद्रकमध्ये झाड पडले आहे. चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारी जिल्ह्यातील जगतसिंगपूर, केंद्रापाडा, भद्रक, जाजपूर आणि बालासोरमध्ये मुसळधार पाऊस व वादळ होण्याचा अंदाज आहे.10 / 16ओडिशा जिल्ह्यातील बालासोर जिल्ह्यात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळांमुळे मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. 11 / 16समुद्रात एक भरती आली असल्यानं या वादळाचा मागोवा घेतला जात आहे. सुपर चक्रीवादळ अम्फानवर विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) मध्ये डॉप्लर वेदर रडार (डीडब्ल्यूआर)द्वारे नजर ठेवली जात आहे.12 / 16अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशमधील हटिया बेट दरम्यान कुठेतरी धडकू शकते. ओडिशा, पश्चिम बंगाल व्यतिरिक्त सिक्कीम आणि मेघालय येथेही गुरुवारपर्यंत वादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 13 / 16पूर्व मदनापूर, दक्षिण 24-परगणा आणि उत्तर 24-परगना हे तीन किनारपट्टी जिल्हे 'अम्फान' ने सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. 14 / 16या तीन जिल्ह्यांव्यतिरिक्त चक्रीवादळ अम्फानचा हावडा, हुगळी, पश्चिम मिदनापूर आणि कोलकाता या दक्षिण बंगालमधील इतर जिल्ह्यांमध्येही परिणाम होण्याची शक्यता आहे. 15 / 16राष्ट्रीय आपत्ती दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 19 टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात आहेत. 16 / 16ओडिशामध्ये 13 टीम तैनात आहेत. तर जवळपास 17 टीमला आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications