By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:54 IST
1 / 8काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासोबत अनपेक्षित आणि अविस्मरणीय घटना घडली. शशी थरूर यांनी काही फोटो पोस्ट करत हा अनुभव सांगितला.2 / 8बुधवारी (४ डिसेंबर) शशी थरूर यांनी काही फोटो शेअर केले. ज्यात शशी थरूर घराबाहेरील गार्डनमध्ये बसलेले असून, त्यांच्या मांडीवर एक माकड बसलेले आहे.3 / 8शशी थरूर वर्तमानपत्र वाचत बसलेले असतानाच हे घडलं. अचानक माकड आले आणि त्यांच्या मांडीवर बसले. हा सगळा किस्सा थरुरांनी लिहिला आहे.4 / 8शशी थरूर म्हणाले, 'जेव्हा मी बागेत बसून वर्तमानपत्र वाचत होतो, एक माकड आत आले आणि थेट माझ्या मांडीवर येऊन बसले.'5 / 8'आम्ही दिलेल्या केळी त्याने खाल्ल्या. माझी गळाभेट घेतली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपले', असे थरूर म्हणाले.6 / 8'मला आनंद आहे की माझा विश्वास खरा ठरला आणि आमची भेट शांततापूर्ण आणि सौम्य राहिली', असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.7 / 8थरूर या प्रसंगाबद्दल म्हणाले, 'ही घटना आपल्या शिकवते की, आपण सृष्टी आणि तिच्या संजीवांबद्दल सन्मानाची भावना ठेवली पाहिजे. मग तो जीव आपल्याला कितीही छोटा किंवा कमजोर वाटत असला तरी', असे शशी थरूर म्हणाले.8 / 8शशी थरूरांनी माकडासोबतचे सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो व्हायरल होत आहे. त्यावर चांगल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या जात आहे.