शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:59 PM

1 / 7
उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना थोड्याच वेळात बाहेर काढले जाणार आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे नाना तऱ्हेचे प्रयत्न असफल ठरलेले असताना रॅट मायनिंग टेक्निकने पुढचा रस्ता दाखविला आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यातील पाईपमध्ये उपाययोजना करण्यात येत आहे. आणखी दोन-तीन तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच सिलक्यारामधून एक व्हिडीओ समोर येत आहे.
2 / 7
गेल्या १७ दिवसांपासून हरतऱ्हेचे प्रयत्न केले तरी अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचता येत नव्हते. ऑगर मशीन अमेरिकेतून एअरलिफ्ट करून आणली ती देखील नादुरुस्त झाली होती. सर्व प्रकारचे एक्स्पर्टनी हार मानली होती. शेवटी एनजीटीने बंदी आणलेली टेक्निक वापरायचा निर्णय झाला आणि एकाच दिवसात हे य़श आले आहे.
3 / 7
अंधश्रद्धा म्हणा की श्रद्धा या मजुरांपर्यंत जाण्याचा मार्ग खुला होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट थेट बोगद्याबाहेर येत बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला आहे. अर्नॉल्ड डिक्स यांनी ताप्तुरते स्थापन केलेले बाबांच्या मंदिरासमोर बसकन मारत प्रार्थना केली.
4 / 7
स्थानिक लोकांनी या बाबा बौख नाग देवतेबाबतची कहाणी सांगितली आहे. जेव्हा बोगद्याचे काम सुरु करण्यात आले तेव्हा ठेकेदार कंपनीने बाबा बौख नाग देवतेचे मंदिर तोडले होते. जेव्हा या जंगलात टनेलचे काम सुरु केले तेव्हा कंपनीने देवतेचे मंदिर तिथे बनविण्याचे 2019 मध्येच कबुल केले होते. परंतू, स्थानिकांचे छोटे मंदिर तोडले होते. अनेकदा स्थानिकांनी कंपनीला याची आठवण करून दिली होती. परंतू, एकाही अधिकाऱ्याने ते गंभीरतेने घेतले नव्हते. यानंतर ही दुर्घटना घडली आहे, हा देवतेचा प्रकोप आहे, असे स्थानिकांनी म्हटले होते.
5 / 7
बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न फेल होताहेत हे पाहिल्यानंतर कंपनीने बोगद्याच्या तोंडावर ताप्तुरते मंदिर बनविले होते. बाबा बौख नाग हे सिल्क्यरासह परिसरातील तीन पट्ट्यांचे प्रमुख देवता आहेत. मंदिराच्या आत नागराजाची मूर्ती आहे. बाबा बौख नाग हे या भागाचे संरक्षक असल्याचे मानले जाते.
6 / 7
मंदिराचे पुजारी गणेश प्रसाद बिजलवान यांनी सांगितले की, अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्राथमिक प्रयत्न अयशस्वी झाले. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन केला. त्यांनी माफी मागितली आणि पूजा करण्यास सांगितले. त्यांनी पूजा केली आणि कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याच्या यशासाठी प्रार्थना केली.
7 / 7
उत्तराखंड ही देवांची भूमी असल्याचे पुजारी म्हणाले. कोणताही पूल, रस्ता किंवा बोगदा बांधण्यापूर्वी स्थानिक देवतेचे छोटेसे मंदिर बांधण्याची परंपरा आहे. त्यांचा आशीर्वाद घेतल्यावरच काम पूर्ण होते. कंपनीने ते मंदिर पाडून चूक केली होती, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड