शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री

By महेश गलांडे | Published: September 25, 2020 7:20 PM

1 / 12
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची...
2 / 12
विराट कोहली ( Virat Kohli) फलंदाजी करताना गावस्कर यांनी लॉकडाऊन काळातील विराट-अनुष्का शर्माच्या एका व्हिडीओवरून कमेंट केली आणि नेटिझन्सनी त्याचा चुकीचा अर्थ लावून माजी क्रिकेटपटूवर टीका केली.
3 / 12
नेटिझन्सच्या या टीकेनंतर विराटची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हीनं इस्टाग्रावर एक मोठी पोस्ट लिहून गावस्कर यांच्यावर टीका केली. पण, खरचं गावस्कर चुकीच्या अर्थाने बोललेच नव्हते.
4 / 12
हिंदीत समालोचन करताना गावस्कर यांनी विराटच्या निराशाजनक कामगिरीवर म्हटले की,''विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.'' लॉकडाऊनमध्ये विराट-अनुष्काचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन गावस्कर यांनी हे विधान केलं होतं. परंतु त्यांच्या या विधानानं चाहते चांगलेच भडकले आहेत.
5 / 12
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली. विराट कोहलीच्या कामगिरीवरून स्वतःचं नाव खेचल्यानं अनुष्का नाराज झाली. तिनं लिहिलं की,''तुम्ही केलेली कमेंट त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीवर पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत, याचं उत्तर मला द्यायला आवडेल.
6 / 12
गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?''
7 / 12
अनुष्का शर्माला उत्तर देताना गावस्करांनी काही प्रश्न विचारले. ते म्हणाले,''मी कुठे तिच्यावर टीका केली? मी कोणती आक्षेपार्ह भाष्य केले? लॉकडाऊनच्या काळात विराट-अनुष्काच्या शेजारील इमारतीवरून कोणतरी व्हिडीओ रिकॉर्ड केला आणि मी त्याबाबतच बोलत होतो.
8 / 12
लॉकडाऊनच्या काळात विराटला क्रिकेटचा सराव करता आला नाही. फक्त त्याचा अनुष्कासोबतचा इमारतीच्या टेरेसवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात अनुष्का त्याला गोलंदाजी करत होती. तेच तर मी म्हणालो.''
9 / 12
सोशल मीडियावरील ट्रोलर्संने लावलेल्या चुकीच्या अर्थामुळेच हा वाद निर्माण झाल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे.
10 / 12
त्यामुळेच, सुनील गावस्कर यांच्या समर्थनार्थही अनेकांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्या आहेत. तसेच, पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावरुन सारं अवलंबून असतं असही सांगण्यात येतंय.
11 / 12
सुनिल गावस्कर यांनी स्पष्टीकरण दिलंय, तरीही त्यांच्या समर्थनार्थ त्यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटर रोहन गावस्कर यानेही ट्विटरवरुन पोस्ट केली आहे.
12 / 12
रोहनने एक डोळ्यांना दिशाभूल करणारी इमेज शेअर केली आहे. तसेच, कशाप्रकारे तुम्ही तुमच्या परीक्षेत नापास होतात, असे रोहनने म्हटले आहे.
टॅग्स :rohan gavaskarरोहन गावसकरSunil Gavaskarसुनील गावसकरAnushka Sharmaअनुष्का शर्माVirat Kohliविराट कोहली