Annoying Relative: Are you also bothered by your relatives? Follow these 5 remedies and get relief…
Family: तुम्हालाही नातेवाईक त्रास देतात? हे ५ उपाय करा आणि अशा मंडळींपासून सुटका मिळवा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 2:22 PM1 / 6कुटुंबामध्ये कुठल्याही एखाद्या नातेवाईकासोबत वादविवाद, मदभेद होणं ही सामान्य बाब आहे. मात्र काही नातेवाईक हे खुपच किरकिरे आणि त्रासदायक असतात. बऱ्याचदा इच्छा नसताना त्यांच्याशी आमना-सामना होतो. अशा नातेवाईकांना कसं टाळायचं, याचे पाच उपाय आम्ही तुम्हाल सांगणार आहोत. 2 / 6आपण काय करायला तयार आहोत आणि काय करायला तयार नाही आहोत, याबाबत स्पष्ट आणि दृढ राहा. आपल्या मर्यादांबाबत विनम्र पण दृढ पद्धतीने बोला. 3 / 6 त्रासदायक नातेवाईकांसोबत संघर्ष टाळणे हे नेहमीच चांगल असतं. विशेषकरून कौटुंबिक कार्यक्रम वगैरे असतील तर अशा वेळी थोडा ब्रेक घ्या. कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत वेळ घालवा किंवा स्वत:ला या स्थितीपासून बाहेक काढा. 4 / 6अशा परिस्थितीत स्वत:ला शांत ठेवा. तसेच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. राग किंवा नैराश्यासोबत प्रतिक्रिया दिल्याने स्थिती नेहमीच बिघडण्याची शक्यता असते. 5 / 6कधी-कधी काही लोक स्वत:च्या जीवनात संघर्घ करत असल्याने इतरांसमोर अडचणी निर्माण करण्याचं काम करतात. तेव्हा तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 6 / 6अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य किंवा डॉक्टरांकडूनही सल्ला घेऊ शकता. तुम्ही कशा पद्धतीने या समस्येचा सामना करू शकता, हे तुम्हाला सांगण्यासाठी ते सक्षम असतीत. आणखी वाचा Subscribe to Notifications