Another glimmer of ISRO, a successful launch of the GSAT-6A satellite
इस्रोची आणखी एक गगनभरारी, GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 11:24 AM1 / 6श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरूवारी जीएसएलव्ही-एफ०८ रॉकेटच्या साह्याने जीसॅट-६ ए (GSAT-6A) या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.2 / 6इस्रोच्या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे. 3 / 6GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना दुस-या दूरच्या भागातील जवानांशी संपर्क साधणं सोपं होणार आहे. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.4 / 6या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे.5 / 62066 किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.6 / 6या उपग्रहात एस-बँड कम्युनिकेशनसाठी ६ मीटर व्यासाचा अँटेना आहे. सोबतच सी-बँड फ्रिक्वेन्सीसाठी ०.८ मीटर व्यासाचा एक फिक्स अँटेना हब कम्युनिकेशनसाठी बसवण्यात आलेला आहे. या उपग्रहामुळे सॅटेलाइट मोबाइल कम्युनिकेशन उपकरणांची नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications