APJ Abdul Kalam Death Anniversary : When Kalam spent iftar budget on charity, orphans
कलामांचा मानवता धर्म; राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टी बंद करून २८ अनाथालयांना दिले होते पैसे! By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:48 AM1 / 10People's President म्हणजेच लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे एपीजे अब्दुल कलाम आपल्याला सोडून जाण्याला पाच वर्षे पूर्ण झालीत. आज त्यांचा स्मृतीदिन. धनुषकोटीतील एका सामान्य कुटूंबातील जन्मलेल्या एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे ११वे राष्ट्रपती बनले, तरी सुद्धा ते एक सामान्य जीवनशैलीच जगत होते. 2 / 10देशासाठी, देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी एपीजे अब्दुल कलाम हे एक प्रेरणास्त्रोत आहेत. एपीजे अब्दुल कलाम यांचे कितीतरी किस्से लोकप्रिय आहेत. 3 / 10. त्यांचा असाच एक किस्सा म्हणजे रमजानच्या महिन्यातील इफ्तार पार्टीबाबतही आहे. ही इफ्तार पार्टी राष्ट्रपती भवनात आयोजित केली जात होती.4 / 10एपीजे अब्दुल कलाम ज्या दिवशी राष्ट्रपती बनले त्या दिवशीच उगाच पैसे खर्च होणाऱ्या गोष्टी बंद करण्यात आल्यात. एक दिवस राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जाणार आहे. लगेच अब्दुल कलाम यांनी त्यांचे सचिव पीके नायरसहीत अधिकाऱ्यांना बोलवलं.5 / 10सगळे अधिकारी कलाम यांच्याकडे आले. कलाम यांना त्यांना विचारले की, राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टीची गरज काय आहे? अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहिले. पण कलाम त्यांना म्हणाले की, राष्ट्रपती भवनाला या खर्चाची गरज काय आहे? त्यानंतर त्यांनी इफ्तार पार्टीसाठी किती पैसे खर्च केले जातात याची माहिती मागवली.6 / 10राष्ट्रपती कलाम यांनी विचारल्यावर राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, इफ्तार पार्टीचा एका दिवसाचा खर्च अडीच लाख रूपये येतो आणि यात देशातील अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी होतात.7 / 10इफ्तार पार्टीसाठी खर्च केली जाणारी रक्कम ऐकल्यावर कलाम म्हणाले की, राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टीची गरज नाही. हे पैसे देशातील अनाथालयांना दान केला जावे. इफ्तार पार्टीत आपल्याकडे जे लोक येतात ते समृद्ध आहेत आणि त्यांना याने काहीही फरक पडणार नाही.8 / 10त्यानंतर इफ्तार पार्टीसाठी खर्च केला जाणारा पैसा कलाम यांनी देशातील अनाथालयांना दान देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती भवनाकडून याची व्यवस्था केली गेली आणि २८ अनाथालयांना कमाल यांच्याकडून आर्थिक मदत पाठवली गेली.9 / 10कलाम यांनी राष्ट्रपती भवनात होणारे विनाकारणचे खर्च रोखण्याचे अनेक निर्णय घेतले. त्यासंबंधी असाच एक किस्सा म्हणजे त्यांचा परिवारातील बरेच लोक दिल्लीला आले होते. 10 / 10कलाम यांनी त्यांच्या जेवणाचा, राहण्याचा आणि फिरण्याचा खर्च स्वत: आपल्या पगारातून केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रपती भवनाला साधारण साडे तीन लाख रूपये दिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications