ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचं शांतता आणि विकासासाठी आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 16:53 IST
1 / 4ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे2 / 4'आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल', असं मोदींनी सांगितलं. 3 / 4'भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे', असं मोदी बोलले आहेत.4 / 4'आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे', असं मोदींनी यावेळी सांगितलं.