आर्मी डे Photos : झंडा उँचा रहे हमारा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 8:05 PM
1 / 10 देशात 15 जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सैन्यादलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. 2 / 10 सन 1949 साली 15 जानेवारी रोजी भारताच्या शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफ जनरल फ्रांसिस बुचरच्या जागी तत्कालीन लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा हे भारतीय सैन्य दलाचे कमांडर इन चीफ बनले होते. 3 / 10 ईस्ट इंडिया कंपनीने सन 1776 मध्ये कोलकाता येथे भारतीय सैन्य दलाची स्थापना केली होती. 4 / 10 आज सकाळी चीफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासह तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. 5 / 10 भारतीय लष्कर दलाचे प्रमुख मुकुंद नरवणे, एयरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि नौसेना प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी शहिदांना मानवंदना केल्यानंतर, जनपथ येथे परेड घेण्यात आलं. 6 / 10 देशाच्या तिन्ही सैन्य दलांनी चित्तथरारक कसरती दाखवून देशाच्य सैन्यदलाचं सामर्थ जगासमोर मांडलं. यावेळी वायूदलाच्या हेलिकॉप्टरने अवकाशात तिरंगा फडकवला. 7 / 10 विजयी विश्व तिंरंगा प्यारा... या गाण्याची प्रचिती आज सैन्य दलाच्या कसरती पाहणाऱ्या नागरिकांनी अनुभवली. देशासाठी बलिदान देणाऱ्या या जवानांना देशवासियांना सॅल्यूट केला. 8 / 10 वायू दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून उड्या घेत, तिरंगा फडकावत केलेल्या कसरती लक्षणीय ठरल्या. आपल्या सैन्यदलाची ताकद अन् प्रभाव अनेकांना याची देही याची डोळा पाहण्यात आला. 9 / 10 वियजी विश्व तिरंगा प्यारा - झेंडा उंचा रहे हमारा.. शान न इसकी जाने पाए, चाए जान भले ही जाए.... सॅल्यूट इंडियन आर्मी 10 / 10 यंदाचा आर्मी दिवस साजरा होताना, महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा क्षण होता. कारण, लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे या मराठी अधिकाऱ्यांनी मानवंदना स्विकारली. तसेच सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. आणखी वाचा