Army officer's wife's murder: Everything you want to know about Shailaja Dwivedi case
शैलजा हत्या प्रकरण : विवाहबाह्य संबंधातून झालेल्या हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती! By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:54 AM1 / 8नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी खुलासा केला की, शैलजा द्विवेदी हत्याप्रकरणी मेजर निखिल हांडाने आपला गुन्हा मान्य केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडाने सांगितले की, शैलजाने त्याच्यासोबत विवाहबाह्य संबंध जुढे सुरु ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिची हत्या केली. 2 / 8पोलिसांनुसार, शनिवारी सकाळी मेजर हांडाने हत्येचा कट रचला आणि दुपारी त्याने हत्या केली. शैलजाचं मेजर हांडासोबत अफेअर होतं. शैलजाचे पती मेजर अमित व्दिवेदी आणि मेजर हांडा दोघेही नागालॅंडमध्ये दीमापूरमध्ये पोस्टेड होते. पण दोन महिन्यांपूर्वीच मैजर अमितची बदली दिल्लीमध्ये झाली होती. 3 / 8या प्रकरणाच्या चौकशीशी निगडीत एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमित द्विवेदी याला पत्नी शैलजा आणि हांडाच्या अफेअरबाबत माहीत होतं. आणि त्याने हे नातं तोडण्याची धमकी पत्नीला दिली होती. त्यामुळे शैलजाने हे अफेअर संपवण्याचला सुरुवात केली होती. तिने हांडासोबत बोलणं बंद केलं होतं. आणि पतीसोबत दिल्लीला आली होती. 4 / 8दिल्लीला आल्यानंतर शैलजा दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली. हांडाला तिच्या ट्रिटमेंटबाबत माहिती होती. काही दिवसांपूर्वीच तो दिल्लीला आला होता. 5 / 8शनिवारी दिल्लीतून शैलजाचा मृतहेद ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर रविवारी मेजर निखील हांडाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. हत्येवेळी हांडाकडे दोन स्विस चाकू होते. पोलिसांनुसार, गेल्या सहा महिन्यात आरोपीने शैलजाला 3 हजार वेळा कॉल्स केलेत. रिपोर्टनुसार हांडाने शैलजाला एक फोनही गिफ्ट केला होता. 6 / 8शैलजा आणि हांडा 2015 पासून एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनुसार, दीमापूरमध्ये होत असलेल्या अधिकारीक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भेटी होऊ लागल्या होत्या. शैलजा आमि हांडा दीमापूरमध्ये शेजारी होती. हांडा इथे एकटा राहत होता. असेही बोलले जात आहे की, मेजर अमित परिवारासोबत दिल्ली शिफ्ट झाले, तेव्हापासून हांडाला शैलजाचं दूर जाणं पचलं नाही. 7 / 8शैलजा जेव्हा नागालॅंडचं घर सोडून अमृतसर आली तेव्हाही आरोपी मेजर शैलजाला भेटण्यासाठी आला होता. शैलजा ही 35 वर्षांची होती. एका वेबसाईटवर असलेल्या तिच्या प्रोफाईलनुसार, शैलजाने अर्बन प्लानिंगमध्ये एमटेक केलं होतं. त्यासोबतच मिस्ट्रेस इंडिया अर्थ मॅगझिनच्या कव्हर पेजवरही ती झळकली होती. 8 / 8शैलजाने डिसेंबर 2009 मध्ये मेजर अमितसोबत लग्न केलं होतं. शैलजाला गायन, डान्स, कुकिंगची आवड होती. एका वेबसाईटवर शैलजाने लिहिले होते की, ती गुरु नानक युनिर्व्हसिटीमध्ये 5 वर्ष लेक्चरर म्हणून काम करत होती. त्यासोबतच एका एनजीओसोबतही तिने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications