शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ram Mandir : थंडीत हीटर, जमिनीवर मॅट, लॉकर...; राम मंदिरात भाविकांना मिळणार 'या' खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:09 AM

1 / 12
अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी राम मंदिर ट्रस्ट आणि योगी सरकारने आढावा बैठक बोलावली होती. त्यानंतर भाविकांसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या. त्याबाबत जाणून घेऊया...
2 / 12
1 - मुख्य दरवाजापासून राम मंदिरापर्यंत मॅटिंगचं काम करण्यात आलं आहे कारण भाविकांना बूट न ​​घालता राम मंदिरापर्यंत फिरता यावं.
3 / 12
2- थंडीची लाट आणि हिवाळ्यात भाविकांचं रक्षण करण्यासाठी मुख्य दरवाजापासून राम मंदिरापर्यंत गॅस हिटर बसवण्यात आले आहेत.
4 / 12
3- दर्शनानंतर रामललाचा प्रसाद मंदिरातून कसा घ्यायचा याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
5 / 12
4- राम मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दोन मार्ग तयार करण्यात आले ज्यामध्ये भाविकांना मल्टी डायव्हर्जनमधून जाता येईल.
6 / 12
5- काही गैरसोय झाल्यास राममंदिर संकुलात अनाउन्समेंटची सुविधाही बसवण्यात आली आहे, जेणेकरून घोषणेद्वारे पोलिसांची मदत घेता येईल.
7 / 12
6- पिवळी स्लिप घेतल्यानंतर राम मंदिर ट्रस्टने बांधलेल्या क्लोक रूममध्ये भाविक त्यांचे सामान (मोबाईल इ. उपकरणे) सुरक्षितपणे ठेवू शकतात.
8 / 12
7- मुख्य गेटपासून सुरक्षा चौकीपर्यंत फास्ट ट्रॅक लेन बनवण्यात आली आहे, जिथे भाविकांना कोणतीही गैरसोय न होता थेट पोहोचता येईल.
9 / 12
8- राम मंदिर ट्रस्टचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही राम मंदिरात दानासाठी अनेक पर्याय दिले आहेत, जेथे भक्त UPI, रोख, चेक आणि ऑनलाइन माध्यमातून दान करू शकतात.
10 / 12
9- राम मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
11 / 12
10- भाविकांच्या मदतीसाठी आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी भक्ती मार्गावर प्रत्येक 10 पायऱ्यांवर सीआरपीएफ आणि पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
12 / 12
अयोध्येत रामललाच्या भक्तांना दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्री योगींनी आवश्यक मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या