Arun Jaitley Death Update arun jaitley Political Journey
Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 2:09 PM1 / 12नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. 2 / 12महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली मध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. 3 / 121957 मध्ये शाळेत प्रवेश. येथेच जेटलींच्या विचारसरणीला व राजकीय विचारांना दिशा मिळाली. त्यानंतर 1969 मध्ये व्यावसायिक कारकीर्दीची पायाभरणी करणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतली. फर्डा वक्ता व विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष म्हणून नाव कमावले.4 / 121974 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दिल्ली विद्यापीठात अभाविपची उमेदवारी घेऊन विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड. त्यानंतर 1975 मध्ये आणीबाणीविरुद्ध बंड पुकारल्याने 19 महिन्यांची जेल. कारावासात विविध व्यक्तींच्या सहवासाने व्यक्तिमत्त्वाला उभारी मिळाली.5 / 121977 मध्ये आणीबाणीच्या असंतोषातून लढल्या गेलेल्या 1977 च्या निवडणुकीत देशभरात प्रचार केला. लोकतांत्रिक युवा मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक पदावरून जनता पार्टीसाठी धडाडीने बाजू मांडली.6 / 121980 मध्ये जेटलींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर 1991 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले. तसेच संयुक्त राष्ट्रांत भारतातून गेलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य झाले.7 / 121999 मध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना अध्यक्षपदी निवड.8 / 122000 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात विधि, न्याय व कंपनी व्यवहार मंत्रालयाची धुरा व 2001 मध्ये जहाज बांधणी मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार. बंदरांच्या आधुनिकीकरणावर लक्ष9 / 122002 मध्ये अरूण जेटली भाजप सरचिटणीस झाले. तसेच 2003 मध्ये मेक्सिकोत जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व.10 / 122006 मध्ये गुजरातमधून राज्यसभेवर फेरनिवड. 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 11 / 1213 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 12 / 1226 मे 1014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. आणखी वाचा Subscribe to Notifications