Arvind Kejariwal: केजरीवाल 'फ्लॉवर' नही 'फायर' है, पंजाब विजयानंतर दाखवला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 18:57 IST
1 / 8दिल्लीसह पंजाबमध्येही ऐतिहासिक विजय संपादन करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणातील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. 2 / 8मोदी सरकारच्या विरोधातील एक नवा चेहरा राष्ट्रीय राजकारणात आता अधिक दमदारपणे पाऊल टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, पंजाबमधील घवघवीत यशानंतर देशभरातून त्यांच कौतूक होत आहे. 3 / 8गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले. 4 / 8त्यांची मनीषा नेहमीच राष्ट्रीय राजकारण करण्याची असल्याचे लपून राहिले नाही. यासाठी त्यांनी २०१४ मध्ये थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून आव्हान दिले होते. परंतु, तेव्हा त्यांची ही चाल अंगलट आली. 5 / 8त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य देणे बंद करून इतर राज्यांमध्ये आपचे जाळे वाढविण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले लक्ष्य पंजाबमध्ये होते. 6 / 8ममता बॅनर्जी, शरद पवार, के. चंद्रशेखर राव, जगन रेड्डी, एम. के. स्टालिन, नवीन पटनायक या प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते केजरीवाल यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील शब्दांना भविष्यात अधिक धार येणार आहे.7 / 8म्हणून आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. 8 / 8या व्हिडिओत केजरीवाल यांची यशोगाथा दाखविण्यात आली असून, केजरीवाल फ्लॉवर नाही, फायर आहे, असे कॅप्शन देण्यात आले आहे. पुष्पा सिनेमातील हा डायलॉग केजरीवाल यांच्या व्यक्तीमत्वाला दाखवण्यात आला आहे.