शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:13 PM

1 / 6
देशभरात नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सार्वजनिक मंडळांकडून देवीची मूर्ती आणि प्रतिमेची स्थापना करुन नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो.
2 / 6
आसामच्या गुवाहाटीमधील एका मंडळाने नवरात्रोत्सवासाठी इस्रोवर आधारीत सुंदर आणि आकर्षक सजावट केली आहे.
3 / 6
इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात साकारण्यात आला आहे. इस्रोचा सुरुवातीपासून ते चांद्रयान-2 असा आतापर्यंतचा प्रवास हा दाखवण्यात आला आहे.
4 / 6
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची यावर्षी शंभरावी जयंती होती. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात अशा पद्धतीने सजावट करण्यात आल्याची माहिती मंडळातील सदस्यांनी दिली आहे.
5 / 6
सजावटीच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची माहिती देण्यात आली आहे. तसेच चांद्रयान-2 चा ही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
6 / 6
चांद्रयान-2 मिशनची सुंदर सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते.
टॅग्स :Navratriनवरात्रीAssamआसामisroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2