शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Assembly Election Result 2022: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट, अशी आहे अंतिम आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:52 PM

1 / 6
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाचे चित्र रात्री उशिरा स्पष्ट झालं आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील अंतिम निकाल हाती आले आहेत. तर उत्तर प्रदेशमधीलही जवळपास सर्व जागांचे निकाल आहे आहेत. या निकालांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहेत
2 / 6
उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांपैकी भाजपाने २५२ जागा जिंकल्या असून, २ जागांवर आघाडी घेतलेली आहे. सपाने १०७ जागा जिंकल्या आहेत तर ५ जागांवर आघाडी घेतली आहे. अपना दलने १२, काँग्रेसने २, रालोदने ८, जनसत्ता दल लोकतांत्रिकने २ जागा जिंकल्या आहेत सुहेलदेव पार्टीने ६ जागा जिंकल्या आहेत. तर निशाद पार्टीने ६ जागांवर विजय मिळवला आहे. बसपा एका जागेवर विजयी झाली आहे.
3 / 6
पंजाबमध्ये सर्व जागांवरील निकाल हाती आले आहेत. येथे ११७ जागांपैकी आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला १८ जागा मिळाल्या आहेत. तर शिरोमणी अकाली दल पक्षाला ३ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २ जागा मिळाल्या आहेत. बसपाला १ तर अपक्षांना १ जागा मिळाली आहे.
4 / 6
उत्तराखंडमधील निकालही जवळपास जाहीर झाले आहेत. येथील ७० जागांपैकी ४७ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. १८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. दोन जागांवर अपक्ष विजय झाला आहे. तर बसपाने १ जागा जिंकली असून एका जागेवर आघाडी घेतली आहे.
5 / 6
मणिपूरमधील ६० जागांपैकी ३२ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर पाच जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. नॅशनल पीपल्स फ्रंटने ७, जनता दल युनायटेडने ६, नागा पीपल्स फ्रंटने ५ जागांवर विजय मिळवला आहे. कुकी अलायन्सने २ तर अपक्षांनी ३ जागांवर विजय मिळवला आहे.
6 / 6
गोव्यामधील ४० जागांपैकी २० जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या आहेत. मगोप आणि आपने प्रत्येकी २ तर गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवा या पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.
टॅग्स :Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२